Shreya Maskar
नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार हा एक तालुका आहे. कंधार किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.
कंधार किल्ला राष्ट्रकूट साम्राज्याची राजधानी होता. किल्ल्याची वास्तुकला आणि स्थापत्यशास्त्र उल्लेखनीय आहे.
किल्ल्याची भव्य तटबंदी, काळ्या दगडांनी बांधलेली मजबूत भिंत यामुळे हा संरक्षणाचा उत्कृष्ट नमुने होता.
राष्ट्रकूटांनी या ठिकाणी 'जगत्तुंग समुद्र' नावाचे मोठे तलाव बांधले, ज्याचे अवशेष आजही दिसतात.
कंधार किल्ल्याच्या परिसरात अनेक शिल्प आहेत. ज्यात कंधार किल्ल्याच्या परिसरात ६० फूट उंच असलेल्या 'यक्ष वास्तुपुरुष' शिल्पाचा समावेश आहे.
कंधार किल्ल्याची स्थापना राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा यांनी केली होती. या किल्ल्याचे बांधकाम ९व्या आणि १०व्या शतकात सुरू झाले.
कंधार किल्ल्याला 'कृष्णदुर्ग' म्हणूनही ओळखले जायचे. हिवाळी सुट्टीत येथे आवर्जून भेट द्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.