PM Saam tv
देश विदेश

PM Salary : भारताच्या सर्वात ताकदवान पद असलेल्या पंतप्रधानांना पगार किती मिळतो? अन्य सुविधा कोणत्या?

Explainer about prime minister salary : भारताती सर्वाधिक पॉवरफुल पद असणाऱ्या व्यक्तीला नेमका किती पगार मिळतो, तसेच या पदावरील व्यक्तीला अन्य कोणत्या सुविधा मिळतात, हे जाणून घेऊयात.

Vishal Gangurde

मुंबई : नरेंद्र मोदी यांनी १० जून रोजी भारताच्या पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी दुसरे नेते ठरले आहेत. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना किती पगार मिळतो आणि कोणकोणत्या सुविधा मिळतात, जाणून घेऊयात.

पंतप्रधानांना पगार किती मिळतो?

पंतप्रधान पद हे भारतातील सर्वात ताकदवान पद आहे. पंतप्रधान पद असणाऱ्या व्यक्तीकडे देशाची धूरा असते. तसेच देशाची महत्वाची जबाबदारी असते. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला मसिक वेतन १.६६ लाख रुपये मिळते. एकंदरीत पंतप्रधानपदावरील व्यक्तीला वार्षिक वेतन २० लाख रुपये मिळते. त्यांना मूळ वेतन ५०००० रुपये, खर्च भत्ता ३००० रुपये,संसदीय भत्ता ४५००० रुपये आणि दैनिक भत्ता २००० रुपये मिळतो.

पंतप्रधानांच्या उत्पन्नाचा स्त्रोत कोणता?

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात एकूण संपत्ती ३.०२ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले. तसेच त्यांनी जाहीर केले की, त्यांचे उत्पन्नाचे दोन स्त्रोत आहेत. पहिलं स्त्रोत म्हणजे पंतप्रधान म्हणून मिळणारे वेतन आणि दुसरे वेतनावरील व्याज.

पंतप्रधानांच्या तुलनेत भारताच्या राष्ट्रपतींना मासिक वेतन ५ लाख रुपये मिळते. तर उपराष्ट्रपतींना मासिक वेतन ४ लाख रुपये मिळते. २०१८ सालापर्यंत राष्ट्रपतींना १.५ लाख रुपये मासिक वेतन आणि उपराष्ट्रपतींना मासिक वेतन १.२५ लाख रुपये मिळत होते.

पंतप्रधानांना कोणत्या सुविधा मिळतात?

पंतप्रधानपदावरील व्यक्तीला वेतनाव्यतिरिक्तही अन्य सुविधा मिळतात. पंतप्रधानपदावरील व्यक्तीला लोक कल्याण मार्गावर अधिकृत सरकारी घर दिलं जातं. या घरासाठी पंतप्रधानपदावरील व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं भाडे भरावे लागत नाही. तसेच या पदावरील व्यक्तीला एसपीजी स्वरुपातील सुरक्षा मिळते. याचबरोबर एअर इंडिया वन विशेष जहाज देखील मिळते.

पंतप्रधान हे मर्सिडीज बेंझ एस ६५० गार्डमधून प्रवास करतात. ही कार बुलेटप्रुफ आहे. एके-४७ रायफलचाही यावर काहीच परिणाम होत नाही. पतंप्रधानपदी दुसरा व्यक्ती विराजमान झाल्यानंतरही माजी पंतप्रधानांना पाच वर्षांसाठी मोफत घर, वीज, पाणी आणि एस एसपीजी सुरक्षा मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Maharashtra Live News Update: माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT