Supreme Court  Saam Tv
देश विदेश

EVM-VVPAT Case Verdict : बॅलेट पेपरवर मतदान नाहीच, VVPAT पत्रिकांची मतमोजणीही नाही; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने बॅलेट पेपरबाबतच्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे निवडणुका इव्हीएम मशिनवरतीच निवडणुका होणार आहेत, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.

Rohini Gudaghe

प्रमोद जगताप साम टीव्ही, नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बॅलेट पेपरबाबतच्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे निवडणुका इव्हीएम मशिनवरतीच निवडणुका होणार आहेत, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

मतदान यंत्रातील मतांची आणि व्हीव्हीपॅट पत्रिकांच्या १०० टक्के पडताळणी संदर्भातल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळं आता यापुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात येणार नसून, या मतदान यंत्रावरच होतील. सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमधील (EVM) मतांची आणि व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) पत्रिकांची १०० टक्के पडताळणीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदान होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बॅलेट पेपरबाबतच्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता निवडणुका EVM मशिनवरतीच होणार आहेत, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. आज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर (EVM-VVPAT Case Verdict) सुनावणी सुरू होती. EVM आणि VVPAT च्या १०० टक्के मोजणीसाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज निकाल देण्यात आला आहे. नेहा राठी, अरुण कुमार अग्रवाल यांनी वकील प्रशांत भूषण यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.

सुनावणीवेळी भूषण यांनी कोर्टाला काही पर्याय सुचवत निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, असं सुचवलं होतं. मात्र, कोर्टाने ते शक्य (EVM-VVPAT Case) नसल्याचं निकाल राखून ठेवताना स्पष्ट केलं होतं. आज न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या पीठाने निकाल दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच आज मतदान होत असताना कोर्ट हा निकाल दिला आहे.

कोर्टाने पुन्हा बॅलेट पेपरवर (Ballot Papers) मतदान घ्यावं, ही मागणी फेटाळली आहे. देशातील निवडणुका या इव्हीएम मशिनवरच होतील. EVM आणि VVPAT या दोन्हींची १०० टक्के पडताळणी करता येणार नाही. सध्या ज्या प्रकारे अंदाजपंचे EVM आणि VVPAT ची मोजणी होते, तशीच मोजणी होणार आहे. सिंबल युनिट हे ४५ दिवसांसाठी सीलबंद ठेवण्यात येईल.

निकालाच्या ७ दिवसांच्या आत उमेदवार पुन्हा पडताळणीची मागणी करू शकतात. मात्र, या सगळ्याचा खर्च उमेदवाराला करावा लागणार असल्याचं न्यायालयाने सुनावणीमध्ये सांगितलं आहे. यावेळी हा निकाल आम्ही दोन्ही न्यायमूर्ती एकमताने देत आहोत, असं देखील न्यायमूर्तींनी न्यायालयात सुनावणीवेळी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

SCROLL FOR NEXT