Volcanic ash from Ethiopia reaches North India, causing toxic smog and severe AQI spike in Delhi and Rajasthan. saam tv
देश विदेश

Ethiopia Volcano Ash: सावधान! ज्वालामुखीची राख भारतात; दिल्लीसह राजस्थानात पसरतंय विषारी धुकं, महाराष्ट्राची परिस्थिती काय?

Ethiopia Volcano: इथियोपियामध्ये १० हजार वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक झाला. उद्रेकानंतर ज्वालामुखीची राख २०-४५ हजार फूट उंच उडाली. ही राख थेट भारतातील दिल्ली, राजस्थान आणि उत्तर भारतापर्यंत पोहोचलीय.

Bharat Jadhav

  • इथियोपियातील ज्वालामुखीची राख उत्तर भारतात पोहोचलीय.

  • राजस्थान आणि उत्तर भारतात दृश्यमानता कमी झालीय.

  • अनेक विमानांचे मार्ग बदलले, काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

इथियोपियामधील हॅली गब्बिन ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. जवळपास १० हजार वर्षांनंतर या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून त्याची राख २५ ते ४५ हजार फूट उंच उडाली. ही राख थेट भारतात पोहोचलीय. दिल्ली, राजस्थान आणि उत्तर भारतातील अनेक ठिकाणी पोहोचलीय. राजधानी दिल्लीच्या अनेक भागात AQI ४०० च्या पार गेला आणि विषारी धुके पसरलंय.

आनंद विहार, एम्स आणि सफदरजंगच्या आसपासची दृश्यमानता कमी झालीय. ज्वालामुखीच्या राखेमुळे अकासा एअर, इंडिगो आणि अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे मार्ग बदलण्यात आलेत आणि तर काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ज्या भागांच्या हवेत राख पसरलीय. त्या भागातून उड्डाणे करण्यास मज्जाव करण्यात आलाय.

तर काही विमानांचे मार्ग बदलण्यास आणि इंजिनची तपासणी करावी असे निर्देश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान कंपन्यांना दिलेत. दरम्यान हवेत राख पसरल्यानं नागरिकांनी भीतीचं वातावरण आहे. परंतु शास्त्रज्ञांच्या मते पृष्ठभागावरील हवेच्या गुणवत्तेवर फारसा परिणाम होणार नाही, परंतु त्यामुळे उंचावरील उड्डाणांना धोका निर्माण होईल.

युरोपियन स्पेस एजन्सीच्या सेंटिनेल-२ आणि टूलूस ज्वालामुखी राख सल्लागार केंद्राच्या अहवालांमध्ये राखेचे लोट हजारो किलोमीटरपर्यंत वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे. उपग्रहाद्वारे या ज्वालामुखीचे काही फोटो मिळवण्यात आली आहेत, या फोटोंमध्ये इथियोपियाच्या हॅली गुब्बी ज्वालामुखी अचानक सक्रिय झाल्याच दिसत आहे. या ज्वालामुखीचा १० हजार वर्षानंतर उद्रेक झाला. शास्त्रज्ञांच्या मते, होलोसीन काळात ज्वालामुखीची कोणतीच हालचाल दिसली नव्हती, त्यामुळे ज्वालामुखीचं उद्रेक होणं हे आश्चर्यकारक आह.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण, विरोधकांचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये आफ्रिकन स्वाईन फिव्हरमुळे 9 वरहांचा मृत्यू

Chhota Kashmir Mumbai: मुंबईतच वसलंय छोटा काश्मीर, हिवाळ्यात पाहायला मिळेल धुकं अन् नयनरम्य निसर्ग

तुम्हें प्रेग्नेंट करना चाहता हूं...; काँग्रेस आमदारावर लैंगिक छळाचे आरोप, ऑडिओ क्लिप अन् चॅट व्हायरल

IIT Mumbai: आयआयटी बॉम्बेचं नाव बदलून आयआयटी मुंबई करा, शरद पवार गटाची मागणी, मराठी अस्मितेसाठी नामांतर आवश्यक|VIDEO

SCROLL FOR NEXT