EWO Raid Saam Tv
देश विदेश

Bhopal EOW Raid: पगार हजारात अन् संपत्ती करोडोंमध्ये... खासदाराच्या क्लर्कचे रहस्य उघड

भोपाळमध्ये लिपिकाच्या घरावर छापा; 85 लाखांची रोकड सापडली

वृत्तसंस्था

मध्य प्रदेश - वैद्यकीय शिक्षण विभागात कार्यरत लिपिक हिरो केसवानी यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) टाकलेल्या छाप्यामध्ये (Raid) कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सापडली आहे.एवढी संपत्ती पाहून तपासासाठी आलेले अधिकारीही चक्रावले.

हिरो केसवानीच्या घरातून सुमारे 85 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय कोट्यवधी रुपयांची जमीन आणि घराची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. हिरो केसवानीच्या घरातून जमिनीच्या कराराशी संबंधित अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. केसवानी यांच्याकडे सुमारे चार कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची कागदपत्रे मिळाली आहेत.

हे देखील पाहा -

तपास पथकाची कारवाई टाळण्यासाठी केसवानी यांनी फिनाईल प्यायले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारासाठी त्याला तातडीने हमीदिया रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. छापेमारी दरम्यान कर्मचाऱ्याच्या घराबाहेर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ईओडब्ल्यूला अनेक दिवसांपासून केसवानीच्या विरोधात अनेक तक्रारी मिळत होत्या. त्याच्या भ्रष्टाचाराची माहिती मिळत होती. यानंतर टीमने त्याच्या घरी ही छापेमारी केली आहे.

हिरो केसवानीची तीन मजली आलिशान इमारत आहे. प्रत्येक मजल्यावरील आलिशान इंटीरियर आणि सजावटीचे काम पाहून EOW टीम थक्क झाली. घराच्या प्रत्येक खोलीत पॅनलिंग आणि लाकूडकाम करण्यात आले आहे. बैरागढमधील हिरो केसवानी यांच्या इमारतीची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे.

बैरागढच्या आसपास विकसित होत असलेल्या वसाहतींमध्ये हिरो केसवानी यांनी महागडे भूखंड खरेदी केले आहेत. हिरो केसवानी यांनी बहुतांश मालमत्ता पत्नीच्या नावावर खरेदी केल्या असून अनेक मालमत्तांची खरेदी-विक्रीही करण्यात आली आहे. हिरो केसवानी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात लाखो रुपये जमा झाल्याचेही आढळून आले आहे. आरोपीच्या पत्नीच्या बँक खात्यात लाखो रुपये जमा झाल्याचे आढळून आले.

हिरो केसवानी यांच्या घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केल्याच्या पावत्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीच्या घरी तीन चारचाकी आणि एक अॅक्टिव्हा स्कूटर सापडली आहे. हिरो केसवानीने 4,000 रुपये प्रति महिना पगार घेऊन नोकरी सुरू केली होती आणि सध्या त्यांचा पगार 50,000 रुपये प्रति महिना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IIM Placement: 'IIM मुंबई' लय भारी; आतापर्यंत २७६ मुलांची कॅम्प्स प्लेसमेंटद्वारे भरती; मिळाले लाखोंचे पॅकेज

Prathamesh Parab Movie: 'आली मधुबाला' प्रथमेश परबच्या चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज

Akhil Akkineni Engagement: नागार्जुनच्या धाकट्या मुलाने गुपचूप उरकला साखरपुडा, कोण आहे भावी सून? पाहा PHOTOS

Grah Gochar: डिसेंबर महिन्यात ७ ग्रह करणार गोचर; 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

Eknath Shinde : मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटेना, केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार, एकनाथ शिंदेंना २ ऑफर?

SCROLL FOR NEXT