Chennai Local Train
Chennai Local Train Saam Tv
देश विदेश

भरधाव लोकल ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढली; पाहा भयंकर व्हिडिओ

साम वृत्तसंथा

चेन्नई: तामिळनाडुची राजधानी चेन्नई मधील रेल्वे (Train) स्थानकावर लोकल ट्रेन रुळावरुन घसरुन थेट प्लॅटफॉर्मवर चढली आहे. या अपघातात कोणती जखमी झालेलं नाही. रिकाम्या इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (EMU) यार्डमधून स्थानकात नेत असताना ही घटना घडली. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

या घटनेत प्लॅटफॉर्मचे मोठे नुकसान झालं आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे ही घटना घडली असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

ट्रेनमधील एका रिकाम्या इलेक्ट्रिक मल्टिपल युनिटने (EMU) जे बफर एंडवर थांबायचे होते ते प्लॅटफॉर्मच्या शेवटी ओव्हरशॉट झाले तेव्हा गोंधळ निर्माण झाला. रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील प्लॅटफॉर्मचे नुकसान झाले. अपघातावेळी लोकोमोटिव्हच्या चालकाने आरडाओरडा करून लोकांना इशारा केल्याने प्लॅटफॉर्मवर असलेल्यांचा जीव वाचला. अपघातावेळी एका रेल्वे कर्मचाऱ्याने उडी मारली. त्याला किरकोळ दुखापत झाली असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातामागील कारण जाणून घेण्यासाठी योग्य स्तरावर तपास केला जाईल, असंही अधिकाऱ्यांनी सांगितले. ९ तासांच्या अथक परिश्रमानंतर ईएमयूला अपघातस्थळावरून काढण्यात यश आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दोन डबे एकमेकांकडे झुकलेल्या कोनात हवेत लटकलेले दिसत आहेत.

यादरम्यान या ट्रेनमध्ये (Train) प्रवासी नव्हते, ही ट्रेन संपूर्ण रिकामी होती. त्यामुळे कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. तब्बल ९ तासानंतर ही ट्रेन बाजूला काढण्यात आली आहे. या घटनेची नोंद बीच पोलीस (Police) ठाण्यात करण्यात आली आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai North West: कोण होणार उत्तर-पश्चिम मुंबईचा खासदार? दोन शिवसैनिकांमध्ये थेट लढत

Today's Marathi News Live : नवी मुंबईत भाजप आणि शिवसेनेत दुरावा कायम, सूत्रांची माहिती

Jalna Election News | शेकडो मतदानकार्ड कचऱ्याच्या ढिगाऱ्यात! जालन्यात काय घडलं?

Special Report | जेलमध्ये जाण्याच्या भितीने पक्षांतर! वायकरांच्या गौप्सस्फोटाने महायुतीचं टेंशन वाढणार?

Sikkim Tourism : सिक्कीममध्ये पर्यटकांचा पूर; तुम्ही जाणार असाल, तर ४ ठिकाणी जायला विसरू नका

SCROLL FOR NEXT