husband dies after wife’s death emotional story 
देश विदेश

पत्नीच्या निधनाचा धक्का, पतीनेही प्राण सोडले; एकाच वेळी अंत्यसंस्कार, साऱ्या गावाच्या डोळ्यात पाणी

Husband Dies After Wife’s Death Shock : पत्नीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने नवऱ्यानेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना झाशीत घडली. अवघ्या १२ तासांच्या अंतरात पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली. दोघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Namdeo Kumbhar

husband dies after wife’s death emotional story : पत्नीच्या निधन झाल्याची धक्कादायक बातमी समजताच नवऱ्याने प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अवघ्या १२ तासात पत्नी अन् पतीचा मृत्यू झाल्याने सगळ्या गावाच्या डोळ्यात पाणी तरळलेय. पती-पत्नीचं नातं संसाराच्या दोन चाकाप्रमाणे असतं. शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांना साथ देत असतात. पण दोघापैकी एकाने साथ सोडली तर दुसऱ्याला प्रचंड वेदना होतात. त्या वेदनेतूनच पत्नीच्या जाण्याचा धक्का सहन झाला नाही अन् नवऱ्याने प्राण सोडले. दोघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आला. उत्तर प्रदेशमधील झाशीमध्ये ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशमधील झाशी जिल्ह्यातील इंग्रानगरमध्ये ही मन हेलावणारी घटना घडली आहे. ७६ वर्षीय रामरतन गुप्ता परिसरातील मोठे व्यापारी होते. ७० वर्षाच्या रामदेवी गुप्ता यांच्यासोबत त्यांचा ५० वर्षांपासून सुखी संसार सुरू होता. दोघांचाही एकाच दिवशी मृत्यू झाला. आधी बायकोने प्राण सोडले, हे ऐकताच रामरतन गुप्ता यांचाही मृत्यू झाला. दोघांची एकाचवेळी अंत्य यांत्रा निघाला अन् एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. रतन गुप्ता यांना अरविंद गुप्ता, धमेंद्र गुप्ता आणि उपेंद्र गुप्ता अशी तीन मुले आहेत.

एकाच वेळी अंत्यसंस्कार, साऱ्या गावाच्या डोळ्यात पाणी

४ ऑक्टोबर रोजी प्रकृती खालावल्यामुळे रामदेवी यांचं सकाळी ९ वाजता अचानक निधन झाले. त्यांच्या निधनाबाबत समजताच गावातील लोक अन् पाहुणे जमण्यास सुरूवात झाली. रामदेवी यांचा मृतदेह पाहून रामरतन यांना मानसिक धक्का बसला. रामदेवी यांच्यावर अंत्यसंस्कार होण्याआधीच रामरतन यांनीही प्राण सोडले. फक्त १२ तासांच्या अंतरात नवरा अन् बायकोचा मृत्यू झाला. दोघांची एकत्र अंत्ययात्रा काढण्यात आली अन् एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आली. हे दृश्य पाहून कुटुंबातील सदस्य रडून रडून बेहाल झाले तर गावकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी तरळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar : 'मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण...; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update: भंडारा शहरातील मिस्कीन टॅंक गार्डनचा तलाव फुटला

Bacchu Kadu : मैत्रीत दुरावा! गुलाबराव पाटलांची भेट न घेताच बच्चू कडू परतले, कारण काय?

Darjeeling Landslide: दार्जिलिंगमध्ये भूस्खलन,17 जणांचा मृत्यू

Pune Drink And Drive : पुण्यात अपघाताचा थरार! मद्यधुंद चालकानं दुचाकीला दिली धडक, दुभाजकावर कार चढवली

SCROLL FOR NEXT