Amit Shah  Saam Tv
देश विदेश

Amit Shah News: गृहमंत्री अमित शाह यांच्या विमानाचे आपत्कालीन लॅडींग, नेमकं काय आहे कारण?

बुधवारी रात्री गृहमंत्री अमित शाह यांच्या विमानाचे आपत्कालीन लॅडींग

Shivaji Kale

Emergency Landing of Amit Shah's Plane : बुधवारी रात्री गृहमंत्री अमित शाह यांच्या विमानाचे गुवाहाटी येथील गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लॅडींग करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह बुधवारी रात्रीच आगरतळाला पोहोचणार होते, मात्र आगरतळ्यातील खराब हवामानामुळे विमान आगरतळा विमानतळावर उतरू शकले नाही. यामुळे विमान गुवाहाटी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे.

अमित शाह भाजपच्या 'जनविश्वास रथयात्रे'ला हिरवा झेंडा दाखवतील आणि त्यानंतर धर्मनगर (उत्तर त्रिपुरा जिल्हा) येथे सकाळी 11 वाजता जाहीर सभा होणार आहे. तिथल्या एका कामगाराच्या घरी ते दुपारचे जेवणही करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने त्रिपुरात रथयात्रेचं आयोजन केलं आहे. याच रथयात्रेचं उद्घाटन करण्यासाठी अमित शाह गुरुवारी सकाळी आगरतळाला रवाना होणार आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे बुधवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विमान आगरतळ्याच्या महाराजा बीर बिक्रम विमानतळावर उतरू शकले नाही. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह बुधवार रात्री त्रिपुराला जाणार होते. या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, आता कार्यक्रमात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPGला स्वदेशी DMEचा पर्याय, गॅसच्या आत्मनिर्भरतेसाठी NCLचा प्रयोग

Maharashtra Live News Update : खामगाव तालुक्यातील रामनगर गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून दोन गटात तणाव

बीड पुन्हा हादरलं! घरातून उचलून विवाहित महिलेवर अत्याचार, नंतर चावडीवर बांधलं

भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर, 73 वर्षीय ज्येष्ठ नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Lawrence Bishnoi Gang Threat: 'अगली बार सीधे माथे में गोली मारेंगे'…; गायक बादशाहला जीवे मारण्याची धमकी

SCROLL FOR NEXT