गुवाहाटीला जाणारे प्रवासी बांग्लादेशात पोहोचले असल्याची घटना समोर आलीय. तीव्र थंडी आणि दाट धुक्याचा हवाई सेवेवर परिणाम होताना दिसत आहे. आज सकाळी हे लॅंडिंग करण्यात आलंय. मुंबईहून आसाममधील गुवाहाटीला (guwahati) जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला दाट धुक्यामुळं बांग्लादेशातील ढाका विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. (latest marathi news)
मुंबईहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला ढाका येथे उतरावे लागलं. गुवाहाटीला पोहोचल्यानंतर खराब हवामानामुळं विमान उतरू शकले नाही, त्यानंतर विमान जवळच्या विमानतळाकडे वळवण्यात आलं. त्यामुळे विमान बांगलादेशची राजधानी ढाका येथे उतरले. सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती मिळतेय. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
प्रवासी पूर्णपणे सुरक्षित
मुंबईहून (Mumbai) विमानात बसलेले लोकं गुवाहाटीला जाणार होते, पण ते बांग्लादेशात पोहोचले. मुंबईहून गुवाहाटीला जाणारे इंडिगो फ्लाइट 6E 5319 (Emergency Landing Of Indigo Flight) हे गुवाहाटीमधील खराब हवामानामुळे बांग्लादेशच्या ढाका येथे उतरले. सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. आता इंडिगो कंपनी बांगलादेशची राजधानी ढाका येथून गुवाहाटीपर्यंत प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करत आहे.
लँडिंग करण्यात अडचण
कंपनीकडून (Indigo Flight) सांगण्यात आलंय की, गुवाहाटीमध्ये (Guwahati) अत्यंत खराब हवामान आणि धुक्यामुळं पायलटला लँडिंग करण्यात अडचण आली. त्यानंतर विमान बांग्लादेशच्या दिशेने वळवले. ढाका (dhaka) एटीसीला याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ विमानाला उतरण्यास परवानगी दिली. त्यानंतर विमान तेथे उतरले. यावेळी सर्व प्रवासी विमानातच बसून राहिले होते. त्यांना नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.
क्रूच्या पर्यायी संचाची व्यवस्था
यानंतर इंडिगो कंपनीने प्रवाशांना खराब हवामानामुळे विमान ढाका येथे उतरावे लागल्याची माहिती दिली. आता ढाका ते गुवाहाटी फ्लाइट चालवण्यासाठी क्रूच्या पर्यायी संचाची व्यवस्था केली जातेय. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल इंडिगोनं दिलगीरी व्यक्त केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.