देश विदेश

India vs Canada : कॅनडा दुतावासमधील कर्मचाऱ्यांची संख्या अजून कमी केली जाणार- परराष्ट्र मंत्रालय

India vs Canada : खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

India vs Canada Row :

खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केले होते. त्यानंतर दोन्ही देशातील वाद विकोपाला गेले आहेत. या वादाचे पडसाद आता जागतिक पटलावर उमटताना दिसत आहेत. भारत-कॅनडा वाद प्रकरणावरुन भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं आज साप्तहिक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं कॅनडा व्हिसा प्रकरणी स्पष्टीकरण दिलं. (Latest News)

सेच दुतावासातील कर्मचाऱ्यांच्या संख्येवरून कॅनडा सरकारला माहिती देण्यात आलीय. दरम्यान कॅनडा सरकारनं भारतावर लावलेले आरोप राजकीय आहेत. भारतावर गंभीर आरोप केल्यानंतर भारतानं आता व्हिसा सेवा तात्पुरती बंद केली असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची म्हणालेत. भारत-कॅनडानं दोन्ही देशाचं उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केलीय. यावर परराष्ट्र मंत्रालयाचं प्रवक्ता बागची म्हणाले की, भारतात कॅनडाचे उच्चपदस्थ अधिकारी जास्त आहेत. तर त्या तुलनेत आपल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. पुढील काही दिवसात दुतावासमधील कर्मचाऱ्यांची संख्या अजून कमी केली जाईल.

आम्ही त्याप्रकरणी कॅनडा सरकारला सूचना दिलीय. राजनैतिक दुतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या सारखी असावी आहे. तसेच कॅनडामधील त्यांची संख्या आपल्यापेक्षा खूप जास्त असल्याचं बागची म्हणालेत. याआधी कॅनडा सरकारनं भारतीय व्हिसा सेवा निलंबित केलीय. आता कॅनडाचे नागरिक व्हिसा सेवेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. कॅनडाचा व्हिसा घेऊन भारतात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी व्हिसा सेवा बंद करण्यात आलीय.

ऑपरेशनल कारणांमुळे, २१ सप्टेंबर २०२३ (गुरुवार) पासून, पुढील सूचना मिळेपर्यंत भारतीय व्हिसा सेवा निलंबित करण्यात आल्या आहेत." तसेच कॅनडातील भारतीय नागरिकांसाठी भारत सरकारनं मार्गदर्शक सुचना जारी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT