Elon Musk New Party Open Saam Tv News
देश विदेश

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Elon Musk New Party Open : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर एलॉन मस्क यांनी मोठा निर्णय घेतला. मस्क यांनी अमेरिका पार्टी नावाच्या नवा राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या राजकारणात यामुळे खळबळ उडाली आहे. पाहूया एक रिपोर्ट...

Prashant Patil

गिरीश निकम, साम टिव्ही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांच्यातील वादाने आता टोक गाठले आहे. पूर्वी एकमेकांचे घनिष्ठ मित्र असलेल्या ट्रम्प आणि मस्क यांच्यात आता थेट राजकीय लढाई पाहायला मिळणार आहे. कारण मस्क यांनी राजकीय पक्ष स्थापन केल्याची घोषणा केली आहे. ट्रम्प सरकारने नुकतेच 'बिग ब्युटीफूल' हे बिल पारित केले आहे. त्यामुळे मस्क चांगलेच भडकले आहेत. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट हे दोघेही पक्ष भ्रष्ट असल्याची टीका करत मस्क यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतलाय.

एलॉन मस्क यांनी एक्सवर म्हटलं आहे की, “अमेरिका पार्टीची आज स्थापना होत आहे. या पार्टीची घोषणा तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य परत देण्यासाठी झाली आहे. हा पक्ष अमेरिकेतील द्विपक्षीय व्यवस्थेविरोधात एक पर्यायी व्यासपीठ असेल. जेव्हा कचरा आणि भ्रष्टाचाराने आपला देश दिवाळखोरीत काढण्याचा विचार येतो तेव्हा आपण लोकशाहीत नव्हे तर एकपक्षीय व्यवस्थेत राहतो. असंही म्हटलं आहे.

मस्क यांनी काही दिवसांपूर्वी जनतेची मते जाणून घेतली होती. अमेरिकेत 80 टक्के मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करणारा एक नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची वेळ आली आहे का?”. या प्रश्नावर 80 टक्के लोक सहमत असल्याचा दावाही त्यांनी केला होता. आता 2028 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मस्क हे उमेदवार असणार की नाही, यावर चर्चा झडू लागल्या आहेत. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच मस्क यांना थेट दक्षिण आफ्रिकेत परत पाठविण्याबाबत सूचक विधान केल्याने खळबळ उडाली होती.

मस्क यांच्या समोर अडचण

अमेरिकेच्या संविधानानुसार राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी एक महत्वाची अट आहे. अमेरिकेत जन्म झाला असेल तर त्या व्यक्तीला ही निवडणूक लढता येते. अमेरिकेबाहेर जन्म झालेला असेल आणि त्यानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या व्यक्तीला निवडणूक लढता येत नाही. मस्क यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे ते राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकत नाहीत, अशी चर्चा आहे.

ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राजकारणात ऐतिहासिक पुनरागमन केलं, तर एलॉन मस्क यांनी ४२० अब्ज नेटवर्थसह तंत्रज्ञान, अवकाश, सोशल मीडिया आणि इलेक्ट्रिक वाहन अशा अनेक उद्योगांमध्ये आपले वर्चस्व निर्माण केलं आहे. दोघेही इलेक्शनच्या ट्रॅकवर आमने-सामने येणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breastfeeding myths: स्तनपानासंबंधीत गैरसमजूतींवर ठेवू नका विश्वास; शंका असल्यास महिलांनी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला

कोकणात राजकीय भूकंप! शरद पवारांना जबरदस्त धक्का, बडा नेता भाजपाच्या गळाला

UPI Rules: UPI च्या नियमांत मोठा बदल! आता ग्राहकांना हे ट्रान्झॅक्शन करता येणार नाही

Crocodile Viral Video: अबब! चक्क बाईकवरून मगरीचा प्रवास, Video होतोय व्हायरल

Maharashtra Politics: हिमतीला दाद! सूरज चव्हाणचं प्रमोशन, पक्षाने सोपावली मोठी जबाबदारी; रोहित पवारांचा अजितदादांना सवाल

SCROLL FOR NEXT