Elon Musk On Chandrayaan 3  Saam Tv
देश विदेश

Elon Musk On Chandrayaan 3: चांद्रयान ३ मोहिमेचं बजेट हॉलिवूड चित्रपटापेक्षाही कमी; इलॉन मस्क म्हणाला, मान गए इंडिया...

Chandrayaan 3 Launched : गातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमत्त्व असलेल्या एलॉन मस्कनेही भारताचे कौतुक केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Elon Musk Appreciate Chandrayaan 3 : 'चांद्रयान ३' च्या सॉफ्ट लँडिंगकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. आज, बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान ३ चे लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरले. जगभरातून देशाचे कौतुक होत आहे. आता जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमत्त्व असलेल्या एलॉन मस्कनेही भारताचे कौतुक केलं आहे.

सध्या सगळीकडेच चांद्रयान ३ ची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर भारताचे प्रचंड कौतुक होत आहे. एक्स (ट्विटर)या प्लॅटफॉर्मवर एकाने पोस्ट केली आहे की, 'चांद्रयान-3 ($75M) साठी भारताचे बजेट इंटरस्टेलर चित्रपटापेक्षा ($165M) कमी आहे'.

या ट्विटवर टेस्ला कंपनीचे प्रमुख एलॉन मस्कने रिप्लाय केला आहे. 'भारतासाठी चांगल गोष्ट' (Good For India) असा रिप्लाय करत भारताचे कौतुक केले आहे.

भारताचे संपूर्ण जगभरातून कौतुक होत आहे. अनेक क्षेत्रातून चांद्रयानसाठी शुभेच्छा पाठवल्या जात आहे. भारतातील प्रत्येक नागरिक चांद्रयानसाठी प्रार्थना करत आहे. भारताच्या चांद्रयान ३ चे बजेट हे एका हॉलिवूड चित्रपटापेक्षाही कमी आहे. त्यामुळे सर्वांना भारताचे कौतुक आहे.

'चांद्रयान ३'चं बजेट

केंद्रीय मंत्री जिंतेद्र सिंह यांनी १४ जुलैला 'चांद्रयान ३' लाँचवेळी या मोहिमेच्या बजेटबद्दल माहिती दिली होती. 'चांद्रयान ३ साठी बजेट जवळपास ६०० कोटी आहे. चांद्रयानसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) आणि देशाचे अभिनंदन', असं जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.

भारत रचणार इतिहास

इस्त्रोची सर्वात महत्त्वपूर्ण मोहिम 'चांद्रयान ३' चे लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर लँड होणार आहे. ही कामगिरी करणारा भारत चीन, अमेरिका आणि तत्कालिन सोव्हिएत युनियननंतरचा चौथा देश ठरणार आहे. तर दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा पहिला देश असेल. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग करणे हा 'चांद्रयान-3' चा उद्देश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT