निवडणूक आयोगानं मतदार ओळखपत्रासाठी मोठा बदल जाहीर केला.
आधार आणि मोबाईल क्रमांक अनिवार्य करण्यात आलाय.
मोबाईल नंबर आधारशी लिंक नसलेले अर्ज रद्द होतील.
निवडणूक आयोगाने आता मतदार ओळखपत्र बनवण्याच्या नियमात बदल केलाय. आधार आणि मोबाईल क्रमांक अनिवार्य करण्यात आले आहे. ऑनलाइन मतदार यादीच्या सेवांसाठी मोबाईल क्रमांक आधारशी जोडणे अनिवार्य करण्यात आलंय. निवडणूक आयोगाच्या मते, आधारशी मोबाईल नंबर लिंक करण्यात न आलेलं एकही अर्ज स्वीकारले जाणार नाही. याबाबतचे वृत्त एका हिंदी वृत्तसंस्थेनं दिलंय.
निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने एका माध्यामांना सांगितले की, हा निर्णय सुमारे एक महिन्यापूर्वी घेण्यात आला होता. आयकर विभाग त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी करत आहे. ही प्रणाली आता पूर्णपणे कार्यरत आहे. आधारशी जोडलेला मोबाईल नंबर असल्याशिवाय कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाहीये.
कर्नाटकात मोठ्या प्रमाणात मतदार यादी वगळल्याबद्दल सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय. मतदार याद्यांमधून पद्धतशीरपणे मतदाराचे नावं वगळले जात आहेत. यामागे एक तिसरी ताकद काम करतेय, आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी केला होता. तसेच राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला होता. अलांड विधानसभा मतदारसंघातून ६,०१८ मतदारांना वगळण्यात आलंय. ही साधी चूक नसून एक संघटित कट आहे आणि लवकरच आणखी मोठे खुलासे होतील असेही राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान निवडणूक आयोगाने आरोप फेटाळून लावलेत.
कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. अंबुकुमार यांनी राहुल यांचे आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की, अलांड विधानसभा मतदारसंघातील ६,०१८ मतदारांना वगळण्यासाठी डिसेंबर २०२२ मध्ये ऑनलाइन फॉर्म-७ अर्ज प्राप्त झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.