Election Commission of India Saam Tv
देश विदेश

Election : ३ राज्यांमध्ये पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर; मतदान आणि निकाल कधी?

election commission announces bypoll dates for three states : निवडणूक आयोगाने तीन राज्यांमधील पोटनिवडणुकांच्या तारखा घोषित केल्या आहेत. ३० जुलैला मतदान होणार असून, ३ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.

Nandkumar Joshi

निवडणूक आयोगाने बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये विधानसभेच्या रिक्त झालेल्या तीन जागांसाठी पोटनिवडणुका घोषित केल्या आहेत. या जागांसाठी ३० जुलै रोजी मतदान होणार आहे. तर ३ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. संबंधित मतदारसंघांमध्ये तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

या रिक्त जागांसाठी होणार पोटनिवडणूक

केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी बिहारमधील बांकीपूर, मध्य प्रदेशातील दतिया आणि गुजरातमधील मांजलपूर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या तीन जागा वेगवेगळ्या कारणांनी रिक्त झाल्या आहेत. बिहारच्या बांकीपूर जागा भाजप नेते नितीन नवीन यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाली होती. तर मध्य प्रदेशातील दतिया येथील राजेंद्र भारती हे अपात्र ठरल्याने ही जागा रिक्त झाली होती. तर गुजरातची मांजलपूर जागा योगेशभाई पटेल यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे -

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, ६ जुलै रोजी नोटिफिकेशन प्रसिद्ध केली जाईल. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १३ जुलै असेल. १४ जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. तर १६ जुलै रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. या जागांसाठी ३० जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर ३ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया ४ ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

मतदार याद्या आधीपासूनच तयार

निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, तिन्ही विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्या आधीपासूनच पूर्ण झालेल्या आहेत. बांकीपूरची अंतिम मतदारयादी ३० सप्टेंबर २०२५, दतिया येथील २१ फेब्रुवारी आणि मांजलपूर येथील १७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

आंदोलकांना देशभरातून मदतीचा हात, जंतर मंतरवर 'ऑनलाईन' लंगर

SCROLL FOR NEXT