Delta Airlines Saam Tv
देश विदेश

Delta Airlines: मद्यधुंद प्रवाशाने विमानात पुरुष अटेंडंटला बळजबरीने केलं Kiss, म्हणाला...तू खूप सुंदर आहेस...

गेल्या काही दिवसांपासून विमानामध्ये प्रवाशांकडून गैरवर्तनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Shivani Tichkule

Delta Airlines Old Man Kissed: गेल्या काही दिवसांपासून विमानामध्ये प्रवाशांकडून गैरवर्तनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रशासनाने याची दखल घेत कडक पावलं उचलली. मात्र आता पुन्हा एकदा विमानप्रवासात अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

एका प्रवाशाने पुरुष अटेंडंटला जबरदस्तीने किस केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील अलास्काला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये एका 61 वर्षीय व्यक्तीने आधी मद्यपान केले. त्यानंतर त्याने एका पुरुष केबिन क्रूला दारूच्या नशेत जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार, डेव्हिड एलन बर्क नावाचा प्रवासी मिनेसोटाहून अलास्काला जात होता. डेव्हिड हा बिझनेस फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करत होता. फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करत असल्याने कोणत्याही प्रवाशाला दारू पिण्यास परवानगी आहे. दरम्यान, विमानाचे (Plane) स्वतःचे काही नियम होते, ज्यामुळे त्याला जास्त दारू पिण्याची परवानगी नव्हती.

उड्डाण दरम्यान, वृद्धांना जास्त दारू पिण्यास मनाई करण्यात आली, ज्यामुळे तो संतापला. यानंतर या वृद्धाने केबिन क्रूला आपले शिकार बनवले. वृद्धाने केबिन क्रूला थांबवले आणि त्याला बळजबरीने किस केलं इतकंच नाही तर त्यांचे कौतुक केले.

या घटनेनंतर फ्लाइट अटेंडंट केबिन क्रू रूममध्ये गेला. विमान उतरल्यानंतर वैमानिकाने विमानतळावर घडलेल्या घटनेची माहिती दिली. यानंतर एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी आरोपीची चौकशी केली.

चौकशीदरम्यान आरोपीने बोलणं टाळलं. मात्र, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून बर्क यांना प्राणघातक हल्ला आणि गुन्हेगारी गैरवर्तनाच्या आरोपाखाली २७ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT