वृत्तसंस्था : बिहार मधील मधेपुरा (Madhepura) येथील एका ८४ वर्षीय वयोवृद्धाने असा दावा केला आहे की, त्याने १ ते २ वेळा नाहीतर ११ वेळा कोरोना (Corona) लसीकरण (Vaccination) केला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांना लसीकरणाचा (Vaccination) फायदा झाला आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा- पुन्हा लसीचे डोस घेतले आहेत. तर काही दिवसापूर्वी तो लस घेण्यासाठी चौसा पीएससी केंद्रावर गेला होता. मात्र लसीकरण बंद झाल्याने त्याला १२ वा लसीचा डोस घेता आलेला नाही.
हे देखील पहा-
ब्रह्मदेव मंडल यांचे आधार कार्डवर वय ८४ वर्ष आहे. ते पोस्ट विभागामध्ये काम करत होते. आता ते सेवानिवृत्त असून गावाकडे (village) राहत असतात. त्यांच्या माहितीनुसार, त्यांनी पहिला लसीचा डोस हा १३ फेब्रुवारी २०२१ ला घेतला होता. तेव्हापासून ३० डिसेंबर २०२१ पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ११ डोस घेतले आहेत. मंडल यांनी लसीचा डोस घेतले ही माहिती संपूर्ण सविस्तर एका कागदावर लिहली आहे.
१३ फेब्रुवारी दिवशी ब्रम्हदेव यांनी पहिला डोस हा जुन्या पीएससी मध्ये घेतला होता. दुसरा डोस १३ मार्च दिवशी तेथेच घेतला होता. तर तिसरा डोस हा १९ मे दिवशी औराय (Aurai) उप आरोग्य केंद्रावर घेतला होता. तर चौथा डोस हा त्यांनी १६ जून दिवशी भुपेंद्र भगत येथील कोटा कॅम्पमध्ये घेतला होता. पाचवी लस ही २४ जुलै दिवशी जुन्या हॉट स्कुलमध्ये झालेल्या कॅम्पमध्ये घेतली होती.
सहावी लस ३१ ऑगस्टला नाथबाबा येथील कॅम्पमध्ये आणि सातवी लस ही ११ सप्टेंबरला जुन्या हॉट स्कुलमध्ये घेतली. आठवी लस ही २२ सप्टेंबरला जुन्या हॉट स्कुलमध्ये तर नववा डोस 24 सप्टेंबरला आरोग्य उपकेंद्र कलासन येथे घेतला तर १० वा डोस हा खगडिया (Khagaria) जिल्ह्यात परबत्ता येथे घेतला आहे. शेवटचा अकरावा डोस हा त्यांनी भागलपूर (Bhagalpur) या ठिकाणी घेतला आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.