Eknath Shinde  Saam TV
देश विदेश

Shinde vs Thackeray : एकनाथ शिंदेंचं पद बेकायदेशीर; ठाकरे गटाचा निवडणूक आयोगासमोर मोठा दावा

Shivsena News: शिवसेना नेमकी कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगासमोर सुरू आहे.

Shivaji Kale

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हे निवडणूक आयोगासमोर जोरदार युक्तीवाद करत आहेत. आयोगासमोर कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाचे शिवसेनेवरील दावे खोडून काढले आहेत. इतकंच नाही तर, त्यांनी एकनाथ शिंदे यांचं पद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. (Maharashtra Political News)

शिवसेना नेमकी कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगासमोर सुरू झाली आहे. दुपारी ४ वाजेपासून या सुनावणीला सुरूवात झाली असून ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हे निवडणूक आयोगासमोर जोरदार युक्तीवाद करीत आहेत.  (Latest Marathi News)

सुरूवातीलाच कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची (ठाकरे गट) घटना निवडणूक आयोगासमोर वाचून दाखवली. शिवसेनेची घटना कायदेशीर नाही, असे शिंदे गट (Eknath Shinde)  कोणत्या आधारावर ते सांगत आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शिवसेनेची घटनाच शिंदे गटाला मान्य नाही तर एकनाथ शिंदेंनी पक्षाचे नेतेपद घेतले ते कोणत्या आधारावर घेतले? अशी विचारणाही कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाला केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा पक्षप्रमुख म्हणून कार्यकाळ 23 जानेवारीला संपतो, प्रतिनिधी सभा घेण्याची आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणी सुद्धा सिब्बल यांनी केली.

'एकनाथ शिंदे यांचं पद बेकायदेशीर'

राष्ट्रीय कार्यकारणी आमच्यासोबत आहेत. शिंदे गटाने शिंदे गटाने नेमलेली राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर आहे. पक्षप्रमुखांची निवड राष्ट्रीय कार्यकारिणीत होऊ शकते. ठाकरे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी ही बरखास्त होऊ शकत नाही. ती घटनेप्रमाणे आहे. मुळात एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील पद बेकायदेशीर असल्याचं कपिल सिब्बल यांनी आयोगासमोर म्हटलं आहे. दरम्यान, कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद संपला असून शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद सुरू केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कारची दुचाकीला धडक, मोटारसायकल स्वारला लांबपर्यंत नेलं फरफटत, दिवेआगरमधील घटना

Night Good Habits: रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 गोष्टी करा, सकाळी उठल्यावर मूड होईल फ्रेश

मोठी बातमी! मिरा-भाईंदरमध्ये भाजपने बसवला गुजराती महापौर

Truck Accident: भीषण अपघात; शंभरच्या स्पीडनं धावणाऱ्या ट्रकच्या धडकेत २ रिक्षांचा चक्काचूर, ५ जणांचा जागीच मृत्यू

शिक्षकांची परीक्षा; इलेक्शन ड्युटी होणार रद्द

SCROLL FOR NEXT