Eknath Shinde vs Uddhav Thackeray : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? याबाबतची सुनावणी आज निवडणूक आयोगासमोर होणार आहे. दुपारी ४ वाजता या सुनावणीला सुरूवात होणार असून निवडणूक आयोग कुणाच्या बाजूने निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, निवडणूक आयोगासमोरील सुनावणीआधी ठाकरे गटाने एक मोठी खेळी खेळली आहे. (Latest Marathi News)
ठाकरे गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वक्तव्याचा दाखल निवडणूक आयोगासमोर ठेवणार असल्याची माहिती आहे. गुरूवारी (19 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत आले असताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणात आम्ही मोदींचेच असल्याचं परदेशात सांगितल्याचं मान्य केलं होतं.
याच वक्तव्याचा दाखला आता ठाकरे गट निवडणूक आयोगासमोर मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आधीच एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे अवैध्य असल्याचा दावा ठाकरे गट करीत आहे. त्यामुळे शिंदेंचा हे विधान त्यांच्याच अंगलट येईल का? अशी चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Political News)
एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?
बीकेसी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाओस दौऱ्याविषयी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, दाओसला प्रत्येकजण मोदींबद्दल विचारत होते. दुसऱ्या देशाचे मंत्री आपण मोदींचे भक्त असल्याचे सांगत होते. ‘आपण’ मोदींना मानता का? असे विचारले असता, मी सांगितले की आम्ही मोदींचीच माणसे आहोत’. मोदींच्याच मार्गदर्शनाखाली आम्हाला मुंबई- महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, असं शिंदेंनी म्हटलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.