Egyptian Church Fire News : इजिप्त देशातून आगीचे वृत्त समोर आलं आहे. इजिप्तमध्ये रविवारी कॉप्टिक चर्चमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेत ४१ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर आगीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग लागल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन बंब पोहोचले आहेत. (Egypt Church Fire news fire broke out in a church in egypt 41 people died)
स्थानिक वृत्त संस्थेला चर्चमधील अधिकाऱ्याकडून ही माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इजिप्तच्या कॉप्टिक चर्चमध्ये आग लागली आहे. या आगीत ४१ जणांचा होरपळून मृत्यू आणि अन्य ५५ जण जखमी झाले आहेत. इम्बाबा येथील लोकांची वर्दळ असलेल्या अबू सेफीन चर्चमध्ये आग लागली आहे.
दरम्यान, कॉप्टिक चर्चमध्ये लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तेथील स्थानिक पोलिसांनी चर्चमध्ये विजेच्या शॉक सर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली आहे. आग लागल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन बंब पोहोचले आहेत. तसेच काही रुग्णवाहिका देखील घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.