ईडीकडून आयपीएसी प्रमुख प्रतीक जैन यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापेमारी
देशातील तब्बल १५ ठिकाणी एकाचवेळी ईडीची कारवाई
छापेमारीदरम्यान ममता बॅनर्जी थेट आयपीएसी कार्यालयात दाखल
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांआधी राजकीय वातवारण तापलंय. निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप कामाला लागलीय. दिल्लीमधील पक्षश्रेष्ठींचे पश्चिम बंगालमध्ये दौरे सुरू झालेत. त्याचदरम्यान राज्यातील वातावरण तापलंय. आज (ईडी) अंमलबजावणी संचालनालयाकडून IPAC चे मालक प्रतीक जैन यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापेमारी केली जात आहे. देशातील तब्बल १५ ठिकाणी छापेमारी सुरूय. दरम्यान जेथे ईडीकडून छापेमारीची कारवाई केली जात आहे, त्याच ठिकाणी स्वत: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पोहचल्या आहेत, त्यामुळे मोठी खळबळ उडालीय.
अंमलबजावणी संचालनालयाने कोलकाता येथील आयपीएसी कार्यालयावर छापा टाकला. त्यानंतर आयपीएसी प्रमुख प्रतीक जैन यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला. दरम्यान ईडीची कारवाई चालू असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तेथे दाखल झाल्या होत्या. त्या स्वत: सोबत काही फाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस देखील आणल्या होत्या. असा आरोप ईडीनं केलाय. IPAC ही एक राजकीय सल्लागार कंपनी आहे.
या कंपनीला ममता बॅनर्जी यांचा पक्ष टीएमसीने २०२६ च्या विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलंय. दरम्यान IPAC कंपनी राजकीय पक्षांनी राजकीय रणनीती ठरवण्यास आणि त्यांच्यासाठी राजकीय योजना आखण्यास मदत करते. दरम्यान ईडीनं या राजकीय सल्लागार कंपनीवर छापा टाकाला असा सवाल उपस्थित होत आहे. आपणा हवाला प्रकरणात ही छापेमारी करण्यात आलीय,असं ईडीनं आपल्या निवेदनात सांगितलंय. हवालाचा पैसा कोळशाच्या तस्कर सिंडिकेटमधून आलाय. या कोळशाचा मोठा भाग शाकंभरी ग्रुप ऑफ कंपनीला विकण्यात आलाय.
दरम्यान ईडीची छापेमारीची कारवाई योग्यप्रकारे केली जात होती, त्यावेळी ममता बॅनर्जी या जबरदस्तीनं कार्यालयात घुसल्या. प्रतीक जैन यांच्या घरात आणि कार्यालयात कारवाई केली जात असताना ममता बॅनर्जी या पोलीस बंदोबस्तासह जबरदस्तीने कार्यालयात घुसल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.