ED Summons To Mahua Moitra Saam Tv
देश विदेश

Mahua Moitra: महुआ मोईत्रा यांना ईडीने पाठवले समन्स, नेमकं काय आहे प्रकरण?

ED Summons To Mahua Moitra: कॅश फॉर क्वेरी प्रकरणी खासदारकी गमावलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

Satish Kengar

ED Summons To Mahua Moitra:

कॅश फॉर क्वेरी प्रकरणी खासदारकी गमावलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) महुआ यांना समन्स बजावलं आहे.

ईडीने त्यांना 19 फेब्रुवारी रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगितलं आहे. ईडीने परकीय चलन उल्लंघन प्रकरणी महुआ यांना चौकशीसाठी बोलावले आहे, असं सांगण्यात येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, गेल्या वर्षी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांनी महागड्या भेटवस्तू आणि पैशांच्या बदल्यात उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी लोकसभेत प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता.  (Latest Marathi News)

महुआ यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केल्याचा आरोपही करण्यात आला होता. यानंतर हे प्रकरण एथिक्स कमिटीकडे पाठवण्यात आले, जिथे महुआ या दोषी आढळल्या. यानंतर महुआ यांची खासदारकी रद्द करण्यात आली.

महुआ मोईत्रा यांना समन्स पाठवल्याच्या मुद्द्यावर ईडीशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, अंमलबजावणी संचालनालयाने तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांना फेमा उल्लंघन प्रकरणात 19 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. महुआ यांना संसदेच्या एथिक्स कमिटीने दोषी ठरवले होते. मात्र त्यांनी आपल्यावरील आरोप खोटे असल्याचं म्हटलं होतं. तसेच आपल्याला लक्ष्य केलं जात असल्याचं त्या म्हणाल्या होत्या.

दरम्यान, महुआ मोइत्रा यांची आधीच सीबीआय चौकशी करत आहे. जे लोकपालच्या सूचनेनुसार त्यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी करत आहेत. प्राथमिक तपासाअंतर्गत, सीबीआय कोणत्याही आरोपीला अटक करू शकत नाही. मात्र ते माहिती घेऊ शकतात. कागदपत्रे तपासू शकतात आणि तृणमूल नेत्याची चौकशी देखील करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

SCROLL FOR NEXT