AAP Mla Amanatullah Khan Arrested  ANI
देश विदेश

Amanatullah Khan Arrested: 'आप'ला आणखी एक झटका; आमदार अमानतुल्ला खान यांना ED कडून अटक

Bharat Jadhav

(प्रमोद जगताप, नवी दिल्ली)

AAP Mla Amanatullah Khan Arrested :

आम आदमी पक्षाचे ओखला येथील आमदार अमानतुल्ला खान यांना ईडीने अटक केलीय. वक्फ बोर्ड नियुक्ती घोटाळ्याप्रकरणी त्यांना पीएमएलए अंतर्गत अटक करण्यात आली. या घोटळ्याप्रकरणी ईडीने त्यांची सुमारे ९ तास चौकशी केली. त्यानंतर ईडीने अमानतुल्ला खान यांना अटक केलीय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी (18 एप्रिल) आमदार अमानतुल्ला खान चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले होते.

आम आदमी पक्षाचे नेते आणि आमदार अमानतुल्ला खान यांच्यावर दिल्ली वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदी ३२ जणांची बेकायदेशीरपणे भरती केल्याचा आरोप आहे. यासोबतच त्यांनी दिल्ली वक्फ बोर्डाच्या अनेक मालमत्ता बेकायदेशीरपणे भाड्याने दिल्यात. तसेच अमानतुल्ला यांनी दिल्ली वक्फ बोर्डाच्या निधीचा गैरवापर केलाय असाही आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी दिल्ली वक्फ बोर्डाच्या तत्कालीन सीईओंनी या बेकायदेशीर भरतीविरोधात निवेदन जारी केले होतं.

या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सप्टेंबर २०२२ मध्ये अमानतुल्ला खान यांची चौकशी केली गेली होती. याआधारे एसीबीने चार ठिकाणी छापे टाकले, तेथून सुमारे २४ लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. याशिवाय दोन बेकायदेशीर व विना परवाना पिस्तूल, काडतुसे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता.

यानंतर अमानतुल्लाविरुद्ध पुराव्याच्या आधारे आणि आक्षेपार्ह साहित्य सापडल्याने त्यांना अटक करण्यात आली. नंतर २८ डिसेंबर २०२२ रोजी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. दरम्यान आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या अटकेनंतर पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह आणि दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी त्यांच्या घरी गेलेत. याआधी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाचे नेते अमानतुल्ला खान यांना वक्फ बोर्डातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता.

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने अमानतुल्ला खान यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे असल्याशिवाय त्यांना अटक करू नये, असे म्हटले होतं. "पुरावे असतील तरच तुम्ही त्याला (अमानतुल्ला खान) अटक करा. तुम्हाला पीएमएलएच्या कलम १९ चे पालन करावे. अटक करण्याच्या अधिकाराला हलक्या घेऊ नका, असं खंडपीठाने ईडीच्या वकिलांना सांगितले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT