ED Action Chinese Loan Apps Saam TV
देश विदेश

चायनीज लोन अ‍ॅप्सवर ED ची मोठी कारवाई; Paytm सह अनेक कंपन्यांना दणका

काही दिवसांपूर्वीच ईडीने या कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले होते.

साम टिव्ही ब्युरो

ED Action Chinese Loan Apps : चायनीज लोन अ‍ॅप प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. ED ने Paytm, Easebuzz, Razorpay आणि Cashfree च्या बँक खाती आणि आभासी खात्यांमध्ये ठेवलेले 46.67 कोटी रुपये गोठवले आहेत. चायनीज लोन अ‍ॅप प्रकरणात काही दिवसांपूर्वीच ईडीने या कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. (ED Action Chinese Loan Apps Latest News)

14 सप्टेंबर रोजी ईडीने बिहारमधील दिल्ली, गाझियाबाद, लखनौ, मुंबई, गयासह 6 ठिकाणी छापे टाकले होते. याशिवाय, एचपीझेड लोन अॅपवर नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात ईडीने दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, जोधपूर आणि बंगळुरू येथील PayTM, Easebuzz, Razorpay आणि Cashfree या पेमेंट कंपन्यांच्या 16 ठिकाणी छापे टाकले होते.

तपास करताना या कंपन्यांच्या व्हर्च्युअल खात्यांमध्ये मोठी रक्कम ठेवण्यात आल्याचे ईडीला समजले. त्यानुसार, EasyBuzz Pvt Ltd (Pune) च्या खात्यात 33.36 कोटी रुपये, Razorpay Software Pvt Ltd च्या खात्यात 8.21 कोटी रुपये, Cashfree Payments India Pvt Ltd च्या खात्यात 1.28 कोटी रुपये आणि Paytm च्या खात्यात 1.11 कोटी रुपये सापडले आहेत.

ईडीच्या निवेदनानुसार, या विविध बँक खाती आणि आभासी खातींमधील सुमारे 46.67 कोटी रुपयांची रक्कम शोधून ती गोठवण्यात आली. नागालँड पोलिसांनी गेल्या वर्षी नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात ईडी मनी लाँड्रिंगची चौकशी करत आहे. (ED Action Latest News)

काय आहे प्रकरण?

HPZ Token ही अ‍ॅप आधारित कंपनी आहे, या कंपनीने बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली वापरकर्त्यांना अधिक फायदे देण्याचे वचन दिले आहे. सुरुवातीला वापरकर्त्यांना HPZ Token F ने कंपनीत गुंतवणूक केल्यावर गुंतवणूक दुप्पट करण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार कंपनीकडून काही अंशी रक्कमही गुंतवणूकदारांना देण्यात आली. मात्र, कंपनीने यातील शिल्लक रक्कम विविध पेमेंट गेटवे आणि बँकांद्वारे विविध व्यक्ती आणि कंपन्यांच्या खात्यात हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.

ईडीने या महिन्याच्या सुरुवातीला रेझरपे प्रायव्हेट लिमिटेड, कॅशफ्री पेमेंट्स, पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड आणि चिनी व्यक्तींद्वारे चालवल्या जाणाऱ्या संस्थांच्या परिसराची झडती घेतली होती. शोध मोहिमेदरम्यान ते बनावट पत्त्याच्या आधारे काम करत असल्याचे आढळून आले. चिनी व्यक्तींच्या नियंत्रणाखाली असलेल्या व्यापारी आयडी आणि बँक खात्यांमधून 17 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. तपासादरम्यान, ते बनावट पत्त्याच्या आधारे काम करत असल्याचे आढळून आले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thailand Bangkok Shooting : भर बाजारात अंदाधुंद गोळीबार! ६ जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःवरही झाडली गोळी

Skin Care Tip: बटाटा लावा आणि चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

Pune Crime News : पुणे हादरलं !सासरवाडीत जाऊन पतीने केली पत्नीची हत्या; धक्कादायक कारण समोर

Shengdana Chikki: श्रावणात खास बनवा शेंगदाणा चिक्की, महिनाभर खाता येईल

SCROLL FOR NEXT