earthquake shocks in delhi ncr punjab haryana himachal  Saam TV
देश विदेश

Earthquake News: राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के; केंद्रबिंदू नेमका कुठे? मोठी अपडेट समोर

Earthquake News Today: देशाची राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. यामुळे रात्रीच्या सुमारास अनेक लोक घराबाहेर पडले.

Satish Daud

Earthquake News Today in Marathi

देशाची राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. यामुळे रात्रीच्या सुमारास अनेक लोक घराबाहेर पडले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या अहवालानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ-चीन सीमेजवळ होता. या भूकंपाची तीव्रता ७.२ रिश्टर स्केल इतकी मोजली गेली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुदैवाने भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत आहे. मात्र, भूकंपाच्या धक्क्यांनी परिसर हादरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीसह (Delhi) उत्तर भारतातील काही भागांना भूकंपाचे अधून-मधून धक्के जाणवत आहेत.

सोमवारी रात्रीच्या सुमारास जम्मू-काश्मीरपासून दिल्ली-एनसीआरपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता इतकी होती, की पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील काही परिसर देखील धक्क्यांनी हादरला. भूकंपामुळं जमीन हादरत होती. (Latest Marathi News)

दरम्यान, भूकंप (Earthquake) होत असल्याचं समोर येताच रात्रीच्या सुमारास मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' च्या माध्यमातून सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू चीनच्या दक्षिण शिनजियांग भागात 80 किलोमीटर खोलीवर होता. त्याचा परिणाम भारताच्या अनेक भागांतही दिसून आला.

काश्मीरच्या डोंगराळ राज्यातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील कटराजवळ ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. यापूर्वी ११ जानेवारी २०२४ रोजी दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.१ इतकी मोजण्यात आली. त्याचे केंद्र अफगाणिस्तानात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळी अन् छठपूजेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात 'या' ठिकाणांहून सुटणार १७०२ विशेष गाड्या

Firecracker Safety Guide: फटाके फोडताना काळजी घ्या! डॉ. अनुपम टाकळकर यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना|VIDEO

Maharashtra Live News Update: सुरतच्या उधना रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग

Viral Fever: दिवाळीनंतर वायरल तापाचा धोका वाढतो? जाणून घ्या कारण

Raigad Crime: सोशल मीडियावरच्या प्रेमासाठी तोडली सात वचनं; प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने काढला पतीचा काटा

SCROLL FOR NEXT