earthquake 
देश विदेश

चिक्कबल्लापुरास भूकंपाचे धक्के; घर साेडून नागरिक रस्त्यावर आले

या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

साम न्यूज नेटवर्क

बंगळूर : कर्नाटकातील बंगळुरूमधील चिक्कबल्लापुरा (chikkaballapura) भागात रहिवाशांना आज (बुधवार) मध्यम स्वरूपाच्या भूकंपाचा (earthquake) धक्का बसला. हा भुकंप सकाळी ७ वाजून १४ मिनीटांनी झाला. त्यानंतर काही वेळातच दूसरा भूकंपाचा धक्का बसल्याचे रहिवाशांनी सांगितलं.

राष्ट्रीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार रिश्टर स्केल ३.३ इतका आहे. भूकंपाचे (earthquake) केंद्र २३ किलाेमीटर खोलीवर भूकंपाच्या केंद्रापासून ७७ किलाे मीटर ईशान्य दिशेला नोंदवले गेले. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कर्नाटकातील (karnataka) बंगळुरूमधील चिक्कबल्लापुरा भूकंपग्रस्त भागात इमारती किंचित हादरल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे घरातील वस्तू पडल्या. काही नागरिकांनी घरातून बाहेर पडत रस्त्यावर येणे पसंत केले. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली नोंदवला गेला. तथापि, त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आलेला नाही. भूकंप झाल्यानंतर अवघ्या काही मिनीटानंतर समाज माध्यमातून परिसरात लाेक एकमेकांना धक्का जाणवला का याची विचारणा करीत हाेती. कर्नाटक राज्यात वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नोव्हेंबरमध्ये चिक्कबल्लापुरा जिल्ह्यातील चिंतामणीसह ग्रामीण भागालाही पाच वेळा भूकंपांचे धक्के बसले होते. वारंवार भूकंप होत असल्याने लोक भयभीत झाले आहे. यापूर्वी भूगर्भशास्त्रज्ञांच्या पथकाने याचा अभ्यास केला होता ही एक विशेष गाेष्ट मानली जात आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : नागपूरमध्ये गौरी विसर्जनादरम्यान भयंकर घडलं! आईसोबत तलावावर गेलेली २ मुले तलावात बुडाली

Maharashtra News Live Update: नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा घोटाळा प्रकरणी SIT चौकशीला तीन महिन्यांची मुदतवाढ

Manoj Jarange : उपोषणात दौरा चांगला नाही, त्रास होत असल्याने दौरा रद्द करू शकतो, मध्यरात्रीच्या सभेत जरांगे पाटलांचे मोठे विधान

Tharala Tar Mag : अर्जुनवर पुन्हा हल्ला; सायलीचा जीवही धोक्यात, श्वेताचा प्लान फसणार की...| VIDEO

मुंबईतील भाजप आमदाराविरोधात पंतप्रधानांकडे गंभीर आरोप; 'त्या' प्रकरणाला मिळालं वेगळंच वळण

SCROLL FOR NEXT