Earthquake in Delhi today  ANI/Twitter
देश विदेश

Earthquake in Delhi today : दिल्ली-एनसीआरपासून उत्तर प्रदेशपर्यंत भूकंपाचे तीव्र धक्के; भीतीने लोक घराबाहेर पळाले!

दिल्ली-एनसआरसहित पूर्ण उत्तर भारतातील जमीन भूकंपाने जमीन हादरली आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : दिल्ली-एनसआरसहित पूर्ण उत्तर भारतातील जमीन भूकंपाने जमीन हादरली आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.६ इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगणिस्तानमधील फैजाबाद सांगण्यात येत आहे. याचबरोबर पाकिस्तानातही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, रात्री १०:१७ वाजण्याचा सुमारास अफगणिस्तानपासून ९० किलो मीटर अतंरावर भूकंपाचे धक्के जाणवले. याचबरोबर नोएडामधील एका सोसायटीमधील नागरिक थेट घरातून बाहेर पळाले. ही लोक भूकंपाच्या (Earthquake) धक्क्याने खूपच घाबरलेले होते. तसेच या भूकंपाच जीवितहानी झाल्याबद्दल माहिती समोर आलेली नाही.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, रात्री १०:१७ वाजण्याचा सुमारास अफगणिस्तानपासून ९० किलो मीटर अतंरावर भूकंपाचे धक्के जाणवले. याचबरोबर नोएडामधील एका सोसायटीमधील नागरिक थेट घरातून बाहेर पळाले. ही लोक भूकंपाच्या धक्क्याने खूपच घाबरलेले होते.तसेच या भूकंपाच जीवितहानी झाल्याबद्दल माहिती समोर आलेली नाही.

उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये भूकंपाचे कमी स्वरुपात भूकंपाचे धक्के जाणवले. या व्यतिरिक्त चमोली, उत्तरकाशीचं गंगा घाट, यमुना घाट, मसूरी, पंजाबचं मोगा, बठिंडा, मानसा, पठानकोट, उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद, सहारनपूर, शामली आणि जयपूरमधील काही भागातील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले.

काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडमध्ये भूकंप

काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडमध्ये 15 मार्च रोजी 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाने जीवितहानीचे वृत्त आलेले नव्हतं. चीनच्या भूकंप मापन केंद्राने या भूकंपाची वेळ चिनी प्रमाणवेळेनुसार 8.56 मिनिटे इतकी सांगितली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल बोंद्रे काँग्रेसमध्येच; बुलढाणा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

'त्या' विधानाने अमरावतीत राजकीय भुकंप! यशोमती ठाकूर बावनकुळेंवर संतापल्या; पाहा काय घडलं?

राजकारणातील सर्वात मोठा धक्का! भाजपचा दारूण पराभव, सर्वच नगरसेवकांनी केली बंडखोरी, चक्रावून टाकणारा निकाल

Cancer symptoms in women: रात्री उशिरा जेवण टाळा! झोप, पचन आणि वजनावर होऊ शकतो परिणाम

भाजप अन् आम आदमी पक्षाची 'या' ठिकाणी युती; राजकारणातली सर्वात मोठी बातमी

SCROLL FOR NEXT