दिल्ली-एनसीआरसह उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याने भीती निर्माण झालीय. भूकंपाचे केंद्र नेपाळजवळ असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ४.६ इतकी नोंदवली गेली आहे. (Latest News)
आहे. भूकंपाचे धक्के आज दुपारी २.५१ वाजता जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर कार्यालय आणि घरात असलेले लोक बाहेर पळू लागले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हा नेपाळमधील दिपायल येथील आहे. हा केंद्रबिंदू हा जमिनीखाली ३८ किलोमीटर खोल होता. या ठिकाणी भूकंपाची तीव्रता ६.२ रिक्टर स्केल इतकी नोंदवण्यात आलीय. या भूकंपाचे धक्के उत्तर प्रदेशसह दिल्लीसह अनेक राज्यात जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नोएडामधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. धक्के जाणवत असताना अनेक सोसायटीमधील नागरिक घराबाहेर पळू लागले.
काय असतो भूकंप आणि त्याचा केंद्रबिंदू
भूकंप तीव्र आणि सौम्य स्वरुपाचे होतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपांपेक्षा सौम्य भूकंपांची संख्या खूपच जास्त असते. भूगर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते. त्यामुळे 'भूकंप लहरी' तयार होत असल्यानं पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. ही हालचाल झाल्याने जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे याला भूकंप म्हणतात.दरम्यान जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंपनाभी म्हणतात.
भूकंपनाभीच्या वर भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हटलं जातं. तीव्र स्वरूपाच्या लाटा किंवा हादरे सर्वप्रथम या केंद्रालगत येऊन पोहोचतात, त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. पृथ्वीवर ज्या ठिकाणी मुळातच भूकवचावर भेगा आहेत, आणि अशा भेगांखालचे खडकांचे थर किंवा शिलाखंडांच्या प्लेट्स जेव्हा एकमेकांवर घसरतात तेव्हा होणाऱ्या हालचाली हे भूकंपाचे कारण असते. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सुद्धा भूकंप होत असतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.