Nitin Gadkari clarifies on E20 petrol row: Is it politics or fuel reality? saam tv
देश विदेश

Nitin Gadkari: नितीन गडकरींना चक्रव्यूहात कोण अडकवू पाहतोय? खुद्द केंद्रीय मंत्र्यांनाच संशय

Nitin Gadkari on E20 Petrol: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी E20 पेट्रोल वादावर मौन सोडले आहे. पैसे देऊन कोणीतरी पैसे देऊन राजकीय षडयंत्र रचत असल्याचा आरोप नितीन गडकरी यांनी केला.

Bharat Jadhav

  • इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांमध्ये खराबी व मायलेज कमी झाल्याची तक्रार.

  • पेड कॅम्पेन चालवल्याचा नितीन गडकरींचा आरोप.

  • इथेनॉल धोरणावर वाद असून, नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात राजकारण केलं जातंय. याबाबत खुद्द मंत्री गडकरींनी खुलासा केलाय. माझ्याविरोधात राजकारण केलं जात आहे. पेड कॅम्पेन चालवलं गेलं असा धक्कदायक खुलासा हायवे मॅन नितीन गडकरी यांनी केलाय.नितीन गडकरी पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील धडाधडीचे आणि परखड मत मांडणारे नेते आहेत. परंतु त्यांनाच कोणीतरी चक्रव्यूहात अडकवू पाहत आहे.

गेल्या काही दिवसांपासून इथेनॉल ब्लेंड फ्यूलबाबत मोठी चर्चा सुरू झालीय. देशभरात अनेकांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर इथेनॉलबाबत धक्कादायक दावा केला होता. इथेनॉलच्या वापरामुळे वाहनांमध्ये खराबी येत असून मायलेज आणि फरफॉर्मेंस कमी होत असल्याचा दावा अनेकांनी केला होता.

दुसरीकडे इथेनॉलचा वापर करण्यात यावा असे आवाहन नितीन गडकरीकडून करण्यात येत होतं. पण वाहनांमधील खराबीमुळे नागरिकांकडून विरोध केला जातोय. काहीजणांकडून थेट गडकरींवर टीका केली जात होती. त्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरींनी उत्तर दिलंय.

नितीन गडकरी हे दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्यूफॅक्चर्स च्या ६५ व्या वार्षिक समारंभात बोलत होते. सोशल मीडियावर आपल्याविरोधात एक राजकीय कॅम्पेन चालवण्यात आलं होतं, त्याचा आपण शिकार झालो होतो. E20 पेट्रोल, ज्यात पारंपारिक इंधनासह २० टक्के इथेनॉल मिश्रित केले जाते. त्यावरून काही चिंता व्यक्त करत होते, परंतु ते अवाजवी चिंता व्यक्त करत होते, असा दावा गडकरींनी केला.

हे इंधन सुरक्षित असून नियामक आणि ऑटोमोबाईल उत्पादक या दोघांचाही त्याला पाठिंबा आहे. ARAI आणि सर्वोच्च न्यायालयाने E20 कार्यक्रमाबद्दल संपूर्ण स्पष्टता दिलीय. मला राजकीयदृष्ट्या लक्ष्य करण्यासाठी सोशल मीडियावर एक मोहीम चालवण्यात आली. ते एक पेड कॅम्पेन होतं. त्यामुळे मी त्याकडे लक्ष देत नाही, असेही नितीन गडकरी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्यात आज पुन्हा मुसळधार पाऊस

Accident : भीषण अपघात! ट्रक-टँकरची जोरदार धडक, टँकरखाली दबून सासू-जावयाचा दुर्दैवी अंत

Kolhapur Tourism : कोल्हापूरमधील छुपा धबधबा, इथं जाताच येईल फॉरेनचा फिल

Viral : पेट्रोल पंपावर दोन गटात तुफान राडा, VIDEO व्हायरल

GST Discount: दसऱ्याला घरी आणा कार; GST कपातीनंतर टाटाच्या या कारवर धमाकेदार डिस्काउंट, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

SCROLL FOR NEXT