American Forces Attack Saam TV
देश विदेश

Drone Attack: सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर ड्रोन हल्ला; तीन सैनिकांचा मृत्यू, अनेक जखमी

American Forces Attack: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.

Satish Daud

Drone attack on American Forces

सीरिया येथील जॉर्डन भागात असलेल्या अमेरिकन लष्करी तळावर रविवारी (२८ जानेवारी) दहशतवाद्यांनी ड्रोन हल्ला केला. यामध्ये तीन सैनिकांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक सैनिक जखमी झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा हल्ला कट्टरपंथी इराण समर्थित दहशतवादी गटांनी केल्याचा आरोपही जो बायडेन यांनी केला आहे. इतकंच नाही, तर या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या सर्वांना आम्ही आमच्या पद्धतीने जबाबदार उत्तर देऊ यात शंका नाही, असा इशाराही बायडेन यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

गाझामधील इस्रायल-हमास (Israel-Hamas War) युद्धादरम्यान जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावर हल्ल्याची ही पहिलीच घटना आहे. या हल्ल्यामुळे युद्धग्रस्त प्रदेशात तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. जॉर्डनला इराक, इस्रायल, पॅलेस्टाईन, सौदी अरेबिया आणि सीरिया यांच्या सीमा आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेचे तीन हजारांहून अधिक सैनिक जॉर्डनमध्ये तळ ठोकून आहे. रविवारी दहशतवाद्यांनी ड्रोनचा वापर करत लष्करी तळावर हल्ला केला. या हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक ठार झाले असून अनेक जखमी झाले आहेत.

जखमीपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो,असंही सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे जॉर्डनकडून या घटनेवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. मात्र, सरकारी टीव्ही चॅनलने सरकारी प्रवक्त्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, अमेरिकन सैनिकांवर झालेला हा हल्ला जॉर्डनच्या बाहेर सीरियाच्या सीमेवर झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT