Pm ModI 
देश विदेश

Divyastra: भारताला मोठे यश; अग्नी-5 ची पहिली चाचणी यशस्वी, पंतप्रधान मोदींनी DRDOचं केलं अभिनंदन

Pm Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन दिव्यस्त्रासाठी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे (scientists) अभिनंदन केलंय. आम्हाला डीआरडीओचा अभिमान आहे. भारताने केलेल्या या चाचणीनंतर आता संपूर्ण पाकिस्तान आणि जवळपास निम्मा चीन क्षेपणास्त्राच्या रडारखाली आलाय.

Bharat Jadhav

Drdo Divyastra Mission Successful :

डीआरडीओचे मिशन दिव्यस्त्राची यशस्वी चाचणी झाली. पंतप्रधान (Prime Minister ) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एक्सवर पोस्ट करत याची माहिती दिलीय. तसेच पंतप्रधान मोदी यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे (scientists) अभिनंदन केलं. 'मिशन दिव्यस्त्रासाठी आमच्या DRDO शास्त्रज्ञांचा अभिमान आहे. स्वदेशात तयार करण्यात आलेली मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) तंत्रज्ञानासह विकसित करण्यात आल्याचं मोदी म्हणाले. (Latest News)

दरम्यान भारताने आज स्वदेशात विकसित केलेली मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) तत्रज्ञान असलेली अग्नी-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ही चाचणी डीआरडीओने केली होती. एक क्षेपणास्त्र वेगवेगळ्या ठिकाणी अनेक युद्धपातळीवर तैनात केले जाऊ शकते. दरम्यान डीआरडीओने याला मिशन दिव्यस्त्र असे नाव दिले होते. अग्नी-5 क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर आता संपूर्ण पाकिस्तान आणि चीनची राजधानी बीजिंगही भारताच्या क्षेपणास्त्राच्या पल्ल्यात आलेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारत वेगवेगळ्या वारहेडसह म्हणजेच युद्ध पातळीवर आणि वेगवेगळ्या ठिकाणी एकाच क्षेपणास्त्राचा वापर करू शकतो. भारताच्या या मोठ्या यशाबद्दल पीएम मोदींनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलंय. या प्रकल्पाच्या संचालिका महिला होत्या. हे क्षेपणास्त्र तयार करण्यात महिलांचे महत्त्वाचे योगदान आहे. या क्षेपणास्त्रच्या यशस्वी चाचणीमुळे भारताचा समावेश अशा देशांच्या यादीत झालाय, ज्यांच्याकडे MIRV क्षमता आहे.

दरम्यान भारताचे हे मिशन स्वदेशी एव्हियोनिक्स प्रणाली आणि उच्च अचूकता सेन्सर सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज आहे. भारताकडे सध्या अग्नी मालिकेची १ ते ५ क्षेपणास्त्रे आहेत. यातील काही कमी पल्ल्याचे तर काहींची पल्ल्याची चांगली आहे. तर अग्नी-5 हे सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र आहे. अग्नी-5 क्षेपणास्त्राची रेंज 3500-5000 किमी आहे. म्हणजेच काही सेकंदात दूरवर बसलेल्या शत्रूंना नष्ट करण्याची ताकद यात क्षेपणास्त्रात आहे. डीआरडीओ या क्षेपणास्त्रांना अत्याधुनिक तंत्रज्ञानासह अपग्रेड करत आहे, याच्यामदतीने भारत शत्रूंना चोख देऊ शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

Police Transfer : पोलिस दलात मोठा फेरबदल, ३९ पोलिसांची तडकाफडकी बदली; नावं अन् धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT