दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी जाहीर सभेत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. क्राइम ब्रँचच्या नोटिशीवर त्यांनी आपण झुकणार नसल्याचे सांगितले. पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या विचारधारेच्या विरोधात लढणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
केजरीवाल यांनी दिल्लीतील किराडी विधानसभा मतदारसंघात 4 शाळांची पायाभरणी केली. यावेळी दिल्ली सरकारच्या कामांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, शिक्षण क्रांतीची जी मशाल पेटली आहे, ती आम्ही कधीही विझू देणार नाही. दिल्ली सरकारने गेल्या 5 वर्षात जे काम केले ते 75 वर्षात झाले नसल्याचा दावा त्यांनी केला. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यादरम्यान काही लोक जाहीर सभेत उभे राहिले आणि त्यांनी भारत माता की जयच्या घोषणांसह केजरीवाल यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी चार शाळांचे उद्घाटन होत असताना अशा शुभप्रसंगी राजकारण करू नका, असे केरीवाल यांनी मंचावरून सांगितले. (Latest Marathi News)
किराडी विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेत घोषणाबाजी होत असताना केरीवाल मंचावरून म्हणाले, "जेव्हा आपण शाळा, मोहल्ला दवाखाने आणि रुग्णालयांचे उद्घाटन करायला जातो, तेव्हा इतर पक्षांचे लोक तिथे पोहोचतात आणि आमच्या विरोधात घोषणाबाजी करतात. आजचा दिवस शुभ आहे. कारण चार शाळांचे उद्घाटन होत आहे. आज किमान हे घाणेरडे राजकारण तरी करू नका.''
यावेळी केजरीवाल म्हणाले की, येथील नवीन शाळांमध्ये 10 हजारांहून अधिक मुले शिकतील. ते म्हणाले, "एक काळ होता जेव्हा सरकारी शाळांची अवस्था अत्यंत वाईट होती. खासगी शाळांमध्ये भरमसाठ फी असल्याने पालक आपल्या मुलांना येथे पाठवू शकत नव्हते. आज 4 शाळांच्या उद्घाटनाला एवढी गर्दी झाली आहे. याचा अर्थ लोक आनंदी आहेत. जे 75 वर्षांत कोणीही केले नाही ते आम्ही 5 वर्षांत केले आहे.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.