Donkey  Saam TV
देश विदेश

सेक्स पॉवर वाढवण्यासाठी आणि स्मार्ट बनण्यासाठी खाल्ल जातंय गाढवाचं मांस; किमतीतही भरमसाठ वाढ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विशाखापट्टनम : गाढवाचे मांस (Donkey) बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आणि सेक्स पॉवर वाढवण्यासाठी खाल्ले जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. आंध्र प्रदेशात हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे येथे गाढवाच्या मांसाची विक्रीदेखील वाढली आहे. वाढत्या मागणीमुळे बंदी असलेले गाढवाचे मांसही (Meat) बाजारात विकले जात आहे. एवढेच नाही तर गाढवाच्या मांसाचे भावही मनमानी पद्धतीने वसूल केले जात आहेत. नुकतीच आंध्र प्रदेशातील बापटला येथे मोठी कारवाई करत पोलिसांनी 400 किलो गाढवाचे मांस जप्त केले होते. पेटाच्या तक्रारीवरून, आंध्र प्रदेश पोलीस वेगाने कारवाई करत आहेत.

बेकायदेशीरपणे गाढवांची कत्तल होत असल्याचे तपासात समोर आले आहे. राज्यात मांसविक्री मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. रस्त्याच्या कडेला, उड्डाणपुलाखाली आणि तात्पुरत्या स्टॉल्सच्या मागे कसाई खुलेआम गाढवांची कत्तल करताना आढळत आहेत. मांस व्यापारीही नफेखोरीसाठी गाढवाचे मांस खुलेआम विकत आहेत.(Latest News Update)

पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (पेटा) इंडियाने आंध्र प्रदेशमध्ये अलीकडेच या प्रकरणाची गुप्तपणे तपासणी केली. या तपासणीत पथकाने ओंगोले, ताडेपल्ली, विजयवाडा, चिराळा आणि बापटला येथे तपासणी केली असता मांसासाठी गाढवांची कत्तल केली जात असल्याचे आढळून आले.

वाढत्या मागणीमुळे भाव वाढले

गेल्या आठवड्यात बापटला जिल्ह्यात पोलिसांनी 400 किलोपेक्षा जास्त गाढवाचे मांस जप्त केले होते. तसेच 7 जणांना अटक करण्यात आली आहे. लोकांमध्ये एक समज आहे की गाढवाचे मांस खाल्ल्याने पाठदुखी आणि दमा बरा होतो. तसेच गाढवाचे मांस खाल्ल्याने लैंगिक शक्ती वाढते. काही लोक तर बुद्धी कुशाग्र होत असल्याचा दावाही करतात. त्यामुळे वाढत्या मागणीमुळे बाजारात गाढवाचे मांस 600 रुपये किलोने विकले जाते.

गाढवांच्या कत्तलीस बंदी

भारतात गाढवांना मारून खाण्यास बंदी आहे. सात वर्षांच्या कालावधीत गाढवांची संख्या सुमारे 61% कमी झाली आहे. गाढवाची कत्तल भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 429 चे उल्लंघन करते आणि त्याला पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाची, दंडासह किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Assembly Election 2024: '५१, ००० रुपये द्या अन् आमदारकीचे तिकीट घ्या...', पक्षाने ठेवली अजब अट; इच्छुकांची कोंडी

SCROLL FOR NEXT