PM Narendra Modi And Donald Trump  Saam Tv
देश विदेश

PM Modi Birthday : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला ट्रम्प यांचा फोन, नेमकी काय झाली चर्चा?

PM Narendra Modi 75th birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या असून, युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल मोदींचे आभार मानले आहेत. या चर्चेला भारत-अमेरिका संबंध दृढ करण्याचा महत्त्वाचा संकेत मानला जात आहे.

Namdeo Kumbhar

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

  • अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या.

  • मोदी आणि ट्रम्प यांच्यात भारत-अमेरिका व्यापार व जागतिक शांततेवर चर्चा झाली.

  • मोदींनी सोशल मीडियावर ट्रम्पच्या शुभेच्छांचा उल्लेख करून आभार मानले.

Donald Trump wishes PM Narendra Modi on 75th birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१७ सप्टेंबर) ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. मोदींना जगभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांच्यातील ही चर्चा दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवर चांगलं संभाषण झाल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे ट्रम्प यांनी सोशल मीडियावर सांगितले. त्याशिवाय रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मोदींचे आभार मानले. दोन्ही देशांमधील व्यापारावर चर्चेत तणाव असताना, भारतासोबत संबंध सुधारण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा संकेत म्हणून याकडे पाहिलं जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल माडियावर पोस्ट केलं. ट्रम्प म्हणाले, “नुकतंच माझ्या मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर खूप चांगलं संभाषण झालं. मी त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. ते खूप चांगलं काम करत आहेत. नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी पाठिंब्याबद्दल धन्यवाद.” पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत ट्रम्प यांचा वाढदिवसाच्या फोन कॉल आणि शुभेच्छांबद्दल आभार मानले. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प.. माझ्या 75व्या वाढदिवसानिमित्त तुमच्या फोन कॉल आणि हार्दिक शुभेच्छांसाठी धन्यवाद.”

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त देश-विदेशातून अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फोनवर शुभेच्छा देत भारत-अमेरिका भागीदारी मजबूत करण्याची प्रतिबद्धता व्यक्त केली. रशियाचे राजदूत देनिस अलिपोव्ह यांनी सोशल मीडियावर हार्दिक शुभकामनांबरोबरच भारत-रशिया मैत्रीचे कौतुक केले. भाजप नेते अमित शाह, निर्मला सीतारामन, देवेंद्र फडणवीस यांनी #MyModiStory हॅशटॅगखाली वैयक्तिक आठवणी शेअर केल्या. लोकसभेचे खासदार बसवराज बोंमई यांनी भावनिक क्षण सांगितले. भाजपने 'सेवा पखवाडा' सुरू केला, तर गुजरातमध्ये रंगोळ्या, गरबा आणि रक्तदान शिबिरे भरली. सोशल मीडियावर लाखो लोकांनी शुभेच्छा दिल्या, मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: २४ तासांच्या आत आरोपीला शोधा, राज ठाकरेंची पोलिसांकडे मागणी

Shocking News: WiFi मुळे वाद , मुलाने आईला बेदम मारलं, बेशुद्ध पडली तरी थांबला नाही, माऊलीचा जागीच मृत्यू, धक्कादायक घटनेचा VIDEO

Jawhar News : हृदय पिळवटून टाकणारी घटना; मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी बाबूंच्या झोळीचा आधार

DINKs trend: Gen Z तरूणींमध्ये ‘नो किड्स’ ट्रेंडची निवड वाढली, फर्टिलिटी अवेअरनेसही ठरतोय महत्वाचा घटक

Raj Thackeray : राज ठाकरेंचा भाजप सरकारवर हल्लाबोल, भारत-पाक मॅचवर काढलं व्यंगचित्र | VIDEO

SCROLL FOR NEXT