PM Modi and Donald Trump saam tv
देश विदेश

PM Modi - Donald Trump : मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा PM मोदींसाठी महत्वाचा निरोप; व्हाइट हाऊस भेटीचं निमंत्रण धाडलं

donald trump invites pm modi to white house : नवी दिल्लीतील सेवा तीर्थावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांसोबतच्या बैठकीत भारत -अमेरिका द्विपक्षीय संबंध अधिक घट्ट करण्यावर, तसेच विविध क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. या चर्चेनंतर परराष्ट्र मंत्र्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा निरोप दिला. मोदींना व्हाइट हाऊस भेटीचं निमंत्रण दिलं.

Nandkumar Joshi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यासोबत शनिवारी एक द्विपक्षीय बैठक घेतली. नवी दिल्लीच्या सेवा तीर्थावर ही बैठक झाली. अमेरिका आणि भारत या दोन देशांमधील संबंध अधिक घट्ट आणि विविध क्षेत्रांत सहकार्य वाढवण्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यात धोरणात्मक भागीदारी, व्यापार, सुरक्षा, क्षेत्रीय मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण झाली. या बैठकीच्या अखेरीला रुबियो यांनी पंतप्रधान मोदींना व्हाइट हाऊस भेटीचं निमंत्रण दिलं.

भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्ट शेअर केली. परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने पंतप्रधान मोदींना नजीकच्या भविष्यात व्हाइट हाऊस भेटीचं निमंत्रण दिलं, असे त्यात नमूद करण्यात आलं. रुबियो यांनी भारत दौऱ्यावर असताना नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. रुबियो यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

PM मोदी-रुबियो भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा

मार्को रुबियो यांनी पश्चिम आशियातील सद्यस्थिती आणि विविध क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर अमेरिकेची काय भूमिका आहे, याबाबत आपले विचार मांडले. तर पंतप्रधान मोदी यांनी शांततेच्या प्रयत्नांना सदैव पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला. तसेच संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून संघर्षावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचं जोरकसपणे सांगितले.

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत नियमित चर्चा आणि सल्ला-मसलत सुरूच ठेवण्यासाठी उत्सुक आहोत, असं पंतप्रधान मोदी रुबियो यांना म्हणाले. या बैठकीला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल देखील उपस्थित होते. या बैठकीबाबत पंतप्रधान मोदी यांनी एक्स हँडलवर पोस्ट केली. अमेरिकी परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे स्वागत करून आनंद झाला. आम्ही भारत-अमेरिका व्यापक वैश्विक रणनीती, क्षेत्रीय आणि वैश्विक शांतता आणि सुरक्षा यासंबंधी मुद्द्यांवर चर्चा केली. भारत आणि अमेरिका जागतिक हितासाठी यापुढेही सहकार्य कायम ठेवणार असल्याचे त्यात नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT