Donald Trump news Saam tv
देश विदेश

आताची सर्वात मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचं राष्ट्राध्यक्षपद जाणार? राजकीय घडामोडींना वेग

Donald Trump news : डोनाल्ड ट्रम्प यांचं राष्ट्राध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेमधील विरोधी पक्षातील खासदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे.

Vishal Gangurde

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळलाय

अमेरिकेत विरोधकांनी 25 व्या घटना दुरुस्तीअंतर्गत ट्रम्प यांना पदावरून हटवण्याची मागणी

अमेरिकेतील विरोधी पक्षातील खासदारांकडून तीव्र प्रतिक्रिया

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट शिवीगाळ केली आहे. इराणच्या विरोधात बोलताना अपशब्द वापरल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अडचणीत सापडले आहेत. अमेरिकेत विरोधी पक्षातील खासदारांकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात २५ व्या घटना दुरुस्तीअंतर्गत अविश्वास प्रस्तावाची मागणी होऊ लागली आहे. आतापर्यंत कमीत कमी ५ खासदारांनी ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. (Donald Trump News)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हटवण्यासाठी २५ व्या घटना दुरुस्तीचा संदर्भ देण्यात येत आहे. या कायद्याअंतर्गत राष्ट्रध्यक्षांना पदावरून हटवून त्यांच्याऐवजी उपराष्ट्राध्यक्षांकडे कार्यभार सोपवला जातो.

डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी एका पोस्टमध्ये इराणच्या विरोधात अपशब्द वापरला. यावरून अमेरिकेत विरोधी पक्षातील खासदार भडकले. अमेरिकेचे लोकप्रतिनिधी बेक्का बालिंट यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'ओबामा किंवा बायडेन यांनी असे शब्द वापरले असते तर रिपब्लिकन पक्षाने काय केलं असतं? त्यांवेळी सर्वांनी पदावरून हटवण्याची मागणी केली असती. त्यामुळे आम्ही देखील डोनाल्ड ट्रम्प यांना पदावरून हटवण्याची मागणी करतो'.

सीनेटर क्रिस मर्फी यांनी पोस्ट करत मागणी केली आहे की, 'मी जर ट्रम्प यांच्या कॅबिनेटमध्ये असतो तर २५ वी घटना दुरूस्ती लागू करण्यासाठी वकिलांशी बोलणे केलं असतं. ट्रम्प लोकांची हत्या करण्याचा मागे लागले आहेत'.

काँग्रेस सदस्य यास्मीन अन्सारी यांनी म्हटलं की, 'राष्ट्राध्यक्ष ट्रम्प वेडे झाले आहेत. त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची योग्य वेळ आहे. कारण ट्रम्प यांच्यामुळे जग संकटात सापडलं आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT