Protesters hold anti-Trump banners during a massive demonstration in the United States following the Iran military strike decision. Saam Tv
देश विदेश

ट्रम्पच्या विरोधात अमेरिकी जनता रस्त्यावर, ट्रम्प गुन्हेगार, अमेरिकेत झळकले बॅनर

Americans Protest Against Donald Trump: अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला केला.. मात्र त्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलंय.. त्याचं नेमकं कारण काय? आणि अमेरिकेतून ट्रम्प यांच्याविरोधात कसा जनक्षोभ उसळलाय...

Omkar Sonawane

मध्य पूर्वेत युद्धाचा आगडोंब उसळलाय...इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करुन ट्रम्प यांच्या नाकात दम आणलाय.. इराण 24 तासात शरण येईल, या आडाख्यांना इराणी लष्कराने तडा दिलाय.. या युद्धाच्या आगीची झळ अमेरिकेला बसू लागलीय आणि अमेरिकन जनतेनं डोनाल्ड ट्रम्प यांना घेरायला सुरुवात केलीय.. फक्त जनताच नाही तर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीही इस्त्रायलच्या दबावामुळेच युद्धात उडी घेण्याची नामुष्की आली अशी भूमिका मांडली... आणि ट्रम्प यांची आणखीनच गोची झाली..

दुसरीकडे अमेरिकचे खासदार थॉमस मॅस्सी यांनी तर एपिस्टीन फाईलवरचं लक्ष हटवण्यासाठी ट्रम्प यांनी इराणवर हल्ला केल्याचा आरोप केलाय.. याच दरम्यान अमेरिकेतील सर्व्हेत ट्रम्प यांचं टेन्शन वाढवणारी माहिती समोर आलीय... अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याचा 65 टक्के विरोध मतदारांनी विरोध केलाय.. तर 35 टक्के मतदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचं समर्थन केलंय.

आता डोनाल्ड ट्रम्प मध्य पूर्वेत कितीही मिसाईल डागून आपली प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न करत असले तरी घरातच जनक्षोभ उसळल्याने आगामी काळात होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांमध्ये ट्रम्प यांच्या सत्तेला हादरा बसण्याचीच शक्यता अधिक आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

महिनाभर रोज एक बदाम खाल्ल्यास शरीरात काय बदल होतील?

Soaked figs: 1 महिना नियमित भिजवलेले अंजीर खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

SCROLL FOR NEXT