Donald Trump Saam Digital
देश विदेश

Donald Trump Arrested: पॉर्नस्टारला पैसे दिल्याप्रकरणी ट्रम्प यांना अटक

Hush Money Case: पॉर्नस्टारला पैसे दिल्याप्रकरणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मंगळवारी अटक करण्यात आली.

साम टिव्ही ब्युरो

Donald Trump News: पॉर्नस्टारला पैसे दिल्याप्रकरणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मंगळवारी अटक करण्यात आली. गुन्हेगारी खटल्याप्रकरणी अटक झालेले ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. तासाभराच्या सुनावणीनंतर ट्रम्प हे न्यायालयाबाहेर पडले आणि माध्यमांना प्रतिक्रिया न देताच तिथून निघून गेले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ डिसेंबर रोजी होणार आहे.

२०१६ मधील अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान ट्रम्प यांनी पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे दिल्याचा आरोप आहे. या आरोपांची चौकशी झाल्यानंतर मॅनहॅटनमधील न्यायालयात ट्रम्प यांच्यावर नुकतेच आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. एकूण ३४ कलमांतर्गत ट्रम्प यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. सुनावणी दरम्यान ट्रम्प यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. (Hush Money Case)

अमेरिकेतील वेळेनुसार मंगळवारी दुपारी (भारतीय वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी) ट्रम्प यांच्यावरील गुन्हेगारी खटल्याची मॅनहॅटनमधील न्यायालयात सुनावणी पार पडली. ट्रम्प हे न्यायालयासमोर शरण गेले. पोलिसांनी अटकेची औपचारिकता पूर्ण करत त्यांना न्यायालयात नेले. अटकेची प्रक्रिया पार पडल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या बोटांचे ठसे घेतले. त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या नव्हत्या. न्यायायलात येताना ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर राग दिसून येत होता, त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळले, असं स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे. न्यायालयाने ट्रम्प यांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्यास मनाई केली असून सुनावणी सुरू होण्यापूर्वी पाच छायाचित्रकार कोर्टरुममध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली होती.

तासाभराच्या सुनावणीनंतर ट्रम्प हे न्यायालयातून बाहेर पडले. माध्यमांना प्रतिक्रिया न देताच ते कारमध्ये बसून निघून गेले. मंगळवारी मॅनहॅटनमधील न्यायालयाबाहेर जगभरातील माध्यमांच्या प्रतिनिधींसोबतच ट्रम्प समर्थक आणि विरोधकही जमले होते. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून न्यायालय परिसरात सुरक्षा यंत्रणांनी फौजफाटा तैनात केला होता.

म्हणून ट्रम्प यांना जामिनासाठी अर्ज करावा लागला नाही

न्यूयॉर्कमधील कायद्यांमध्ये २०२० मध्ये सुधारणा करण्यात आली होती. यानुसार काही कलमांतर्गत जामिनाची आवश्यकता नाही. ट्रम्प यांच्यावरील आरोप हे न्यूयॉर्क कायद्यानुसार Class E श्रेणीतील आहेत. या कलमांतर्गत ट्रम्प यांना जास्तीत जास्त चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

'वाह! मला अटक करणारेत'

‘मी मॅनहॅटनच्या दिशेने निघालोय. ते मला अटक करणारेत. वाह! हे अमेरिकेत घडतंय यावर विश्वास बसत नाहीये’ असं ट्रम्प यांनी अटकेपूर्वी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT