Manasvi Choudhary
चेहऱ्यावरचे काळे डाग, पिंपल्सचे वण किंवा पिगमेंटेशनमुळे चेहऱ्याचा नैसर्गिक उजळपणा कमी होतो. तुम्ही घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने चेहऱ्यावरचे काळे डाग काढू शकता.
स्वयंपाकघरातील काही सोप्या टिप्सने तुम्ही चेहऱ्यावरील काळे डाग कमी करू शकता ते उपाय कोणते ते या वेबस्टोरीमध्ये पाहूया.
लिंबू हा नैसर्गिकरित्या ब्लिचिंगचे काम करतो लिंबूमध्ये तुम्ही मध मिक्स करून हे चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील काळे डाग कमी होतील.
बटाटा किसून त्याचा रस काढा. हा रस कापसाच्या मदतीने डागांवर लावा. २० मिनिटे ठेवा आणि धुवून टाका.
रोज रात्री झोपण्यापूर्वी काळे डागांवर कोरफडचा रस लावा आणि हलक्या हाताने मसाज करा यामुळे त्वचेवरील काळे डाग कमी होतील.
चेहऱ्यावर दही किंवा ताक लावून १०-१५ मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
उन्हामुळे काळे डाग अधिक गडद होतात, त्यामुळे घराबाहेर पडताना 'सनस्क्रीन' नक्की लावा.