Dog Birthday Party Saam TV
देश विदेश

Dog Birthday Party: विषय हार्डये! कुत्र्याची जंगी बर्थडेपार्टी; सेलिब्रेशनसाठी पाण्यासारखा ओतला पैसा

Dog Birthday: काही व्यक्ती आपल्या पाळीव कुत्रा, मांजरींना कपडे देखील घालतात.

साम टिव्ही ब्युरो

Uttar Pradesh Dog Birthday: कुत्रा - मांजर असे पाळीव प्राणी पाळल्यावर माणसांना त्यांचा लळा लागतो. त्यांना काय हवे काय नको या सर्व गोष्टी व्यक्ती त्यांना पुरवतात. आपली जशी लाईफस्टाईल आहे त्याच प्रमाणे व्यक्ती आपल्या पाळीव प्राण्यांना वागवतात. त्यांच्या जेवणाच्या वेळेची काळजी घेतात. इतकेच नाही तर काही व्यक्ती आपल्या पाळीव कुत्रा, मांजरींना कपडे देखील घालतात. (Latest Marathi News)

अशात आता अशा पाळीव प्राण्यांचे वाढदिवस साजरे करण्याचे क्रेज आले आहे. व्यक्ती कुत्रा, मांजर यांचाही वाढदिवस साजरा करतात. वाढदिवस साजरा करणे प्रत्येकालाच आवडते. कुत्रा किंवा मांजरीचा वाढदिवस फारफार तर घरातल्याघरात किंवा काही ओळखीचे मित्र बोलावून केला जात असेल. मात्र एका व्यक्तीनं चक्क शाही लग्नसोहळ्याप्रमाणे आपल्या कुत्र्याचाही वाढदिवस साजरा केला आहे.

११ किलोच्या केकसह रिटर्न गिफ्ट

ट्रान्सलम कॉलेजमधील प्रोफेसर डॉ. शमीम अहमद यांचा हा श्वान आहे. जो सेंट बर्नाड ब्रीड प्रजातीचा हा श्वान असून शमीम यांचा श्वानावर फार जीव आहे. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शमीम यांनी मोठं रेस्टॉरंट बूक केलं होतं. वाढदिवसाला त्यांनी तब्बल ११ किलोंचा केक मागवला. तसेच जेवणात पंच पकवान ठेवण्यात आलं होतं.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठ जिल्ह्यातील गंगानगरमध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. लग्नातील शाही सोहळ्यासारखा हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जेवणासह चाट, पाणीपुरी, गुलाबजामून, चायनीज असे अनेक पदार्थ ठेवण्यात आले होते.

पंच पकवानासह रिटर्न गिफ्टमध्ये महागडा फ्रीज

श्वानाच्या वाढदिवशी बरेच पाहुणे आले होते. या पाहुण्यांनी वाढदिवस झाल्यावर श्वानाचे लाड करत त्याला बर्थडे गिफ्ट दिलं. पाहुण्यांनी दिलेल्या गिफ्टच्या बदल्यात त्यांना पुन्हा गिफ्ट देण्यासाठी शमीम यांनी एक लकी ड्रॉ ठेवला होता. यात ज्या व्यक्तीला लकी ड्रॉ लागला त्यांना फ्रीज गिफ्ट म्हणून देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला पालकांसोबत राहण्यास जबरदस्ती करता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Post Office: पोस्ट ऑफिसच्या नियमात मोठा बदल, सुकन्या योजना ते पीपीएफवर होणार परिणाम

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये महायुतीतील वादात स्थानिक पदाधिकाऱ्यांची उडी,शिवसेनेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस

Pune village : मोरांचे नंदनवन! पुण्यातील 'या' ठिकाणी अनुभवता येईल गावाकडचा आनंद

SCROLL FOR NEXT