Application Process Of CAA Saam Tv
देश विदेश

CAA Implementation Eligibility Criteria: भारताचं नागरित्व मिळवण्यासाठी कसा कराल अर्ज; जाणून घ्या कोण ठरतील पात्र, अर्जाची प्रक्रिया

CAA Eligibility Criteria: सीएए लागू करण्याची अधिसूचना लागू केल्यानंतर सरकारने आता नागरिकत्व मिळवण्यासाठी नवीन एक पोटर्ल सुरू केले आहे. या पोर्टलवरून भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

Bharat Jadhav

How To Apply For Application Process Of CAA:

देशाच्या संसदेत ११ डिसेंबर २०१९ रोजी नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ कायदा(CAAमंजूर करण्यात आले. २०१९ चे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणत सरकारने १९५५ च्या नागरिकत्व विधेयकात सुधारणा केली आहे. २०१९-२० मध्येही केंद्र सरकार आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने वारंवार स्पष्ट केले होतं की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा लोकांना नागरिकत्व देण्याचा कायदा असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. (Latest News)

ज्या नागरिकांना नागरिकत्व घ्यायचं आहे ते ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. यासाठी सरकारने एक पोर्टल तयार केले आहे. या कायद्यातून सरकार पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांग्लादेशमधील हिंदू, जैन, बौद्ध, शीख, आणि पारसी धर्माच्या लोकांना भारतीय नागरित्व देण्यात येणार आहे. सीएए २०१९ च्या अंतर्गत त्यांना नागरिकता मिळणार आहे.

अर्ज करण्यास कोण आहे पात्र

पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशमधील हिंदू, जैन, बौद्ध, शीख आणि पारसी लोकांचे शोषण होत असेल तर त्या लोकांना भारतीय नागरित्व मिळणार आहे. या देशातून जे नागरिक ३१ डिसेंबर २०१४ आधी आले असतील त्यांना CAA 2019 अंतर्गत भारतीय नागरिकतेचा अर्ज करता येईल. जे नागरिक बऱ्याच काळापासून देशात राहत आहेत. त्यांना नागरिकता देण्यात येईल.

नागरिकत्वासाठी अर्ज करण्यासाठी काय करावे लागेल

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या

  • Indiancitizenshiponline.nic.in

  • CAA 2019 अंतर्गत भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज सबमिट करण्यासाठी 'क्लिक' पर्यायावर क्लिक करा.

  • तुमचा मोबाईल नंबर, कॅप्चा कोड एंटर करा आणि पुढील पेजवर जा.

  • पुढील पेजवर तुमचा ईमेल आयडी, नाव आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

  • OTP (वन टाइम पासवर्ड) साठी तुमचा ईमेल आणि मोबाईल तपासा.

  • OTP टाका आणि त्यांची पडताळणी करा. अतिरिक्त पडताळणीसाठी कॅप्चा कोड पुन्हा-एंटर करा.

  • पडताळणी यशस्वी झाल्यानंतर, तुमची वापरकर्ता नोंदणी पूर्ण होते.

ऑनलाइन अर्ज

  • लॉगिन विंडो उघडा आणि कॅप्चा कोडसह तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाइल नंबर टाका. त्यानंतर "सुरू ठेवा" या पर्यायावर क्लिक करा.

  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी मिळेल. त्यानंतर OTP टाका. कॅप्चा कोड पुन्हा एंटर करा. “सत्यापित करा आणि पुढे जा”या पर्यायावर क्लिक करा.

  • यशस्वी पडताळणीनंतर केल्यानंतर 'नवीन अर्ज सुरू करण्यासाठी येथे क्लिक करा' हा पर्याय दिसेल.

  • अर्जदार आपल्या मागील जीवनाविषयीचे ८ ते ११ प्रश्नांची उत्तरे द्या. यात २०१४ पूर्वीचे वास्तव्य, मूळ ठिकाण आणि किती कालावधीपासून येथे राहत आहात.

  • याची माहिती विचारली जाते. योग्य पर्याय निवडून अर्जदाराला प्रश्नांची उत्तरे “होय” किंवा “नाही” असे द्यावी लागतील.

  • CAA 2019 च्या तरतुदींनुसार आता स्वीकार करा किंवा आणि सबमिट वर क्लिक करा.

  • सध्याचा पत्ता, कुटुंबिक माहिती जर काही गुन्हा नोंद असेल तर त्यासंदर्भाततील माहिती देणं आवश्यक आहे.

  • दिलेल्या सुचनानुसार, कागदपत्रे अपलोड करा.

  • मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक ऑनलाइन पेमेंट करा.

  • दरम्यान अर्ज करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर CAA 2019 अंतर्गत नागरिकत्वासाठी अर्ज करण्यासाठी “सबमिट” वर क्लिक करा.

  • या सूचनांचे पालन करून तुम्ही भारतीय नागरिकत्वासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण कराल.

इतर मदत लागत असेल तर येथे संपर्क साधा

अर्ज प्रक्रियेदरम्यान कोणत्याही अडचणी आल्यास किंवा प्रश्न पडल्यास support.ctznoci@mha.gov.in मेल करत संपर्क साधा. याशिवाय इतर अजून मदतीसाठी गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची अधिकृत संपर्क माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे, तेथे संपर्क साधावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peanut And Jaggery: थंडीमध्ये शेंगदाणे-गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

Tongue Taste Change: 'या' आजारांमुळे अचानक बदलते जीभेची चव; दुर्लक्ष करणं तुम्हाला पडेल महागात

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोरगी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT