डीजेच्या आवाजाने चक्क ६३ कोंबड्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू Saam Tv
देश विदेश

डीजेच्या आवाजाने चक्क ६३ कोंबड्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू

ओडिशाच्या बालासोरमध्ये एक अजबच प्रकरण पोलीस ठाण्यात येऊन पोहोचले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : ओडिशाच्या बालासोरमध्ये एक अजबच प्रकरण पोलीस ठाण्यात येऊन पोहोचले आहे. एका पोल्ट्री फार्म मालकाने आपल्या शेजाऱ्याच्या विरोधातच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचे कारण देखील खूप वेगळे आहे. लग्नसोहळ्यामध्ये जोराचा डीजे वाजवल्याने पोल्ट्री मधील ६३ कोंबड्या मेल्याचा दावा यावेळी मालकाने केला आहे.

ओडिशातील बालासोरमध्ये एका पोल्ट्री फार्म मालकाने आपल्या शेजाऱ्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लग्नाच्या वरातीत जोरजोरात डीजे वाजवला होता. तसेच आतिषबाजी देखील जोरात करण्यात आली होती. या आवाजामुळे पोल्ट्री फार्ममधील ६३ कोंबड्या दगावल्याचा आरोप त्यानी यावेळी केला आहे. नीलागिरी पोलीस ठाण्यामध्ये त्याने ही तक्रार दाखल केली आहे.

हे देखील पहा-

कंडागराडी गावातील रहिवासी पोल्ट्री फार्मचा मालक रंजित परिदा यांनी हा दावा केला आहे. त्यांचा शेजारी रामचंद्र परिदा यांनी काढलेल्या वरातीमध्ये दणक्यात डीजे वाजवला होता. त्यामुळे पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या दगावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास लग्नाची वरात त्याच्या पोल्ट्री फार्मजवळून गेली होती. या वरातीमध्ये डीजे वाजवला होता.

यामुळे पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या सैरावैरा पळू लागले होते. त्याने अनेकदा डीजेचा आवाज कमी करण्याची विनंती केली होती. मात्र, असह्य डीजेचा आवाज घुमतच होता. त्यामुळे पोल्ट्री फार्ममधील ६३ कोंबड्या मृत्युमुखी पडले आहेत. रंजितने दिलेल्या माहितीनुसार की, डीजेच्या आवाजामुळे कोंबड्या जोरजोरात फडफडू लागले होते. काही तर सैरावैरा पळत देखील होते.

थोड्या वेळाने सर्व कोंबड्या जमिनीवर निपचित पडले आहेत. त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करून घेतली आहे. तर त्यावेळी जोराच्या आवाजाने कोंबड्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. अभियांत्रिकी पदवी प्राप्त रंजितला नोकरी मिळू शकली नाही. त्याने २०१९ मध्ये नीलागिरीमध्ये एका सहकारी बँकेकडून २ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या पैशामधून त्याने स्वतःचे पोल्ट्री फार्म सुरू केले होते.

सुरुवातीला रंजितने शेजारी राहणाऱ्या रामचंद्रकडून नुकसान भरपाई मागितली होती. मात्र, त्याने भरपाई देण्यास नकार दिला. शेवटी काहीच पर्याय नसल्याने रंजितने त्याच्याविरोधामध्ये नीलगिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे का, याचा तपास केला जात आहे. दुसरीकडे रामचंद्र याने सर्व आरोप फेटाळले आहे. लाखो कोंबड्यांची वाहतूक केली जाते.

रस्त्यावरून अनेक वाहने जोरजोरात हॉर्न वाजवत असतात. या आवाजाने कधी काही होत नाही. मग डीजेच्या आवाजाने कोंबड्या कशा मरू शकतात, असा सवाल त्यानी यावेळी केला आहे. ज्यावेळी रंजितने डीजेचा आवाज कमी करण्यास सांगितले, त्यावेळी आम्ही त्याचे म्हणणे ऐकून घेतले. डीजेचा आवाज कमी केला, असे रामचंद्रचे म्हणणे आहे. दरम्यान, याबाबत तक्रार प्राप्त झाली असून, तपास केला जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime नवऱ्याकडून गर्भातील बाळाच्या DNA टेस्टची मागणी, ५ महिन्यांच्या गरोदर महिलेची आत्महत्या

Maharashtra News Live Update: पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते

निवृत्त DIG च्या घरावर ईडीचा छापा; तब्बल ५३ कोटींची संपत्ती जप्त

Gaurav and Akanksha: 'आम्ही वर्षभरापासून वेगळे राहतोय'; बिग बॉस विजेता गौरव खन्ना आणि आकांक्षा यांचा ९ वर्षांचा संसार मोडला

High Blood Pressure : वयाच्या 30-40 मध्येच वाढतोय BP? जाणून घ्या यामागची मोठी कारणं

SCROLL FOR NEXT