PM मोदी यंदा राजौरीमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार Saam Tv
देश विदेश

PM मोदी यंदा राजौरीमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या जवानाबरोबर दिवाळी साजरी करणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या जवानाबरोबर दिवाळी साजरी करणार आहेत. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामधील नौशेरा सेक्टरमध्ये जवानाबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी जाऊ शकणार आहेत. पीएम मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेजवळ जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यामधील अनेक विभागामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर, पंतप्रधानांच्या जवानाबरोबर दिवाळी साजरी करण्याचे ठिकाण शेवटच्या क्षणी बदले जाऊ शकते.

हे देखील पहा-

दरम्यान, पंतप्रधान मोदी जेव्हा सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जात असतात, तेव्हा सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची भेट गुप्त ठेवण्यात येते. पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच जम्मू- काश्मीर मधील जवानाबरोबर दिवाळी साजरी करत आहेत, असे नाही. याअगोदर २०१९ मध्ये आर्टिकल ३७० हटवल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू- काश्मीरमध्ये दिवाळी साजरी केली होती. यावेळी पंतप्रधान मोदींनी राजौरी जिल्ह्यात तैनात असलेल्या जवानाबरोबर दिवाळी साजरी केली होती. दरम्यान, पंतप्रधान मोदी दरवर्षी सीमेवर तैनात असणाऱ्या जवानाबरोबर दिवाळीचा सण साजरा करत असतात.

यावेळी पंतप्रधान जवानांसोबत वेळ घालवत असतात. तसेच त्यांचे मनोधैर्य उंचावण्याचे काम करत असतात. या अगोदर पंतप्रधान मोदींनी उत्तराखंड मध्येही जवानाबरोबर दिवाळी साजरी केली आहे. दिवाळीच्या शुभमुहुर्तावर काल केंद्र सरकारकडून सामान्य लोकांना काहीसा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या भावात अनुक्रमे ५ आणि १० रुपयांची कपात करण्याचा काल निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यांनीही त्यांच्या व्हॅट करात कपात करण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. याला प्रतिसाद देत तात्काळ गोव्याने पेट्रोल आणि डिझेलच्या भावात अतिरिक्त ७ रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. आता महाराष्ट्रात वॅट करात कधी कपात होणार? असा सवाल सर्वांकडून केला जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : दिवसभर खिसा रिकामा राहणार नाही; ५ राशींच्या लोकांच्या मनातील इच्छा होणार पूर्ण

Rahuri By-Election: राहुरी पोटनिवडणूक होणार चुरशीची; ठाकरेंचा हुकमी एक्का उतरला रिंगणात, पण...

David Warner: डेव्हिड वॉर्नरला अटक; क्रिकेट विश्वात खळबळ, नेमकं कारण काय?

Alarm clock history: जुन्या काळात अलार्म नसताना लोकं सकाळी कशी उठायची?

Shocking : वाहतूक कोंडी ठरली जीवघेणी! ट्रॅफिकमध्ये ॲम्ब्युलन्स अडकल्याने महिलेचा मृत्यू; २६ दिवसांचं बाळ आईविना पोरकं

SCROLL FOR NEXT