Boss gifts Lamborghini worth Rs 4 crore to employee saam tv
देश विदेश

कर्मचाऱ्यांची दिवाळी 'सुपरफास्ट'; मालकाकडून 4 कोटींची लॅम्बोर्गिनी कार गिफ्ट

Lamborghini Car Gift: दिवाळीत तुम्हाला कंपनीनं सोनपापडी दिली नाही म्हणून नाराज आहात का? तुटपूंज बोनस मिळाला म्हणून कंपनी सोडायच्या विचारात आहात का? तर थांबा एका कर्मचाऱ्याला मालकानं दिवाळीसाठी चक्क 'लॅम्बोर्गिनी' गिफ्ट कार दिलीय. त्यामुळे तुम्हालाही घसघशीत बोनस हवा असेल तर हा स्पेशल रिपोर्ट पाहायला विसरू नका.

Suprim Maskar

  • दिवाळीनिमित्त मालकाने कर्मचाऱ्याला दिली 4 कोटींची लॅम्बोर्गिनी

  • कंपनीचं टार्गेट पूर्ण केल्यामुळे कर्मचाऱ्याला महागडी कार गिफ्ट

  • दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्याला मिळालं कोट्यवधींचं गिफ्ट

दिवाळी जवळ आल्यानं प्रत्येक कर्मचारी बोनसची वाट पाहतो असतो..मात्र एका मालकानं कंपनीचं टार्गेट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्याला थेट 4 कोटींची 'लॅम्बोर्गिनी' गिफ्ट म्हणून दिलीय. कंपनीच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित एका खास पुरस्कार सोहळ्यात कर्मचाऱ्याला ही कार गिफ्ट म्हणून दिली.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नतालिया चावेझ या महिला कर्मचाऱ्याला ही 'लॅम्बोर्गिनी' दिवाळीआधी गिफ्ट म्हणून मिळालीय. दुबईतील ‘रिचकी प्रॉपर्टीज’ या नामांकित रिअल इस्टेट कंपनीत नतालिया काम करते. गेल्या 2 वर्षांत नतालियानं तब्बल 500 दशलक्ष डॉलर्सपेक्षा म्हणजेच सुमारे 4 हजार 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे रिअल इस्टेट व्यवहार कंपनीसाठी पूर्ण केले होते. 'रिचकी प्रॉपर्टीज’चे संस्थापक आणि सीईओ दबान ओथमान यांनी तिला उत्कृष्ट कामाबद्दल हे गिफ्ट दिलंय.

दुबईमध्ये लॅम्बॉर्गिनी उरुस या कारची किंमत अंदाजे 2.3 कोटी ते 4 कोटी रुपयांच्या घरात जाते. एका कर्मचाऱ्याच्या निष्ठा आणि मेहनतीला कंपनीने दिलेले हे टक्क्यांच्या पलीकडचे बक्षीस सध्या कॉर्पोरेट विश्वात चर्चेचा विषय ठरलंय. एका सामान्य कर्मचाऱ्यापासून ते थेट 4 कोटींची गाडी मिळवण्यापर्यंतचा नतालियाचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यामुळे यंदा दिवाळीत तुम्हाला सोनपापडी मिळो अन्यथा तुटपूंजा बोनस कामावर लक्ष दिलात. तर एक दिवस चांगल फळ तुम्हाला नक्कीच मिळेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१७ आमदारांच्या बैठकीनंतर बंडाच्या चर्चेला उधाण; इंडिया आघाडीतील आणखी एक पक्ष फुटणार?

महिलांसाठी मोठी बातमी! राज्यातील लोकप्रिय योजनेच्या नियमात बदल; अदिती तटकरेंची घोषणा

रेल्वे स्टेशनवर तरुणांची स्टंटबाजी, सोशल मीडियावर लाईक्ससाठी जीवघेणा खेळ

रिल सिंघम विरुद्ध रिअल सिंघम, मुंढेंचा थेट बॉलिवूडला दणका

Jalgaon SBI Bank Robbery: भरदिवसा स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; तब्बल 30 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास, आरोपींना सिनेस्टाईलने पकडलं

SCROLL FOR NEXT