Imran Khan Saam TV
देश विदेश

Imran Khan: निवडणुकांसाठी सज्ज, पाकिस्तानची संसद बरखास्त करा - इम्रान खान

पाकिस्तानच्या संसदेच कामकाज २५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाहोर: निवडणुकांसाठी आपण सज्ज असून आता पाकिस्तानची संसद (Parliament of Pakistan) बरखास्त करा अशी मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी आज केली आहे. इम्रान खान यांच्या पंतप्रधान पदाचा फैसला आज होणार होता याबाबतच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करताना विराधकांचा अविश्वास ठराव पाकिस्तानच्या (Pakistan) नॅशनल असेंब्लीच्या डेप्युटी स्पीकर यांनी इम्रान खान यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव फेटाळत तो घटनाबाह्य असल्याचं घोषित केलं शिवाय आता संसदेच कामकाज २५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

हे देखील पहा -

या सर्व घडामोडीनंतर जनतेशी संवाद साधताना खान म्हणाले, विरोधकांनी मांडलेला अविश्वास ठराव म्हणजे परकीय शक्तीचं षडयंत्र असून आहे. पाकिस्तानी (Pakistan) जनतेनं आता निवडणुकांसाठी तयार रहावं तुम्हाला देशाचा निर्णय घ्यायचा आहे. असं म्हणतच त्यांनी आम्ही पुन्हा निवडणुकीसाठी (Elections) सज्ज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

त्यामुळे आता तुर्तास जीवदान भेटलेल्या पंतप्रधान यांच्या मागणीनुसार संसद बरखास्त होणार का? की संसद २५ तारखेला सुरु झाल्यानंतर विरोधक आणखी काही रणनीती आखणार हे पाहण महत्वाच ठरणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : कपड्यांवर पडलेले तेलाचे हट्टी डाग निघत नाही, मग हे उपाय करुन बघा कपडे नव्या सारखे चमकतील

Bollywood Actress : पन्नाशी गाठली तरी अभिनेत्रीनं लग्न केलं नाही, म्हणाली- "मी खुप आनंदी आहे..."

Income Tax Return: ITR मध्ये चूक झाली? शेवटचे ४ दिवस उरले; डेडलाइननंतर भरावा लागेल दंड

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Kidney Trafficking : चंद्रपूर किडनी प्रकरणात दुसर्‍या आरोपीला अटक; चीन कनेक्शन आले समोर

SCROLL FOR NEXT