Data Protection Act Become Law:  Saamtv
देश विदेश

Digital Data Protection Bill: तुमचा डेटा आता सुरक्षित! देशात डिजिटल डेटा संरक्षण कायद्याला मंजुरी; काय आहेत तरतुदी?

Data Protection Act Become Law: भारतीयांची डिजिटल गोपनीयता सुनिश्चित करणारा हा देशातील पहिलाच कायदा असेल.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, प्रतिनिधी...

Digital Personal Data Protection Bill: लोकसभा आणि राज्यसभेने मंजूरी दिल्यानंतर डिजिटल डेटा संरक्षण विधेयकाला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे आता देशात डिजिटल डेटा संरक्षण कायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्याने सरकारला एक डेटा प्रोटेक्शन बोर्ड तयार करण्याचा अधिकार मिळाला असून या बोर्डाला सोशल मीडियावरील मजकूरा संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

काय आहे कायदा?

डिजिटल डेटा संरक्षण (Data Protection Bill) विधेयकाला राष्ट्रपती मुर्मू (Draupadi Murmu) यांनी मंजूरी दिली आहे. या कायद्यामुळे सामान्य लोकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या विधेयकात कंपन्यांकडून वैयक्तिक माहितीचा गैरवापर केल्यास दंडाची तरतूद केली आहे. अशाप्रकारे, भारतीयांची डिजिटल गोपनीयता सुनिश्चित करणारा हा देशातील पहिलाच कायदा असेल.

या कायद्यानुसार, ग्राहकांकडून त्यांची वैयक्तिक माहिती घेण्यापूर्वी सोशल मीडिया कंपनीला ग्राहकांची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. हा नियम तोडणाऱ्या कंपनीला 250 कोटींचा दंड करण्याची तरतूद या कायद्यात आहे. सध्या देशात डिजिटल वैयक्तिक डेटाबद्दल जागरुकतेचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे, त्यामुळे हा कायदा महत्वाचा मानला जात आहे.

थोडक्यात, गोपनीयतेच्या अधिकारांतर्गत नागरिकांचा डेटा गोळा करणे, संग्रहित करणे आणि वापरणे यासाठी इंटरनेट कंपन्या, मोबाइल अॅप्स आणि व्यावसायिक घराणे इत्यादींना अधिक जबाबदार बनवणे हे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे. गोपनीयतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे.

काय आहेत नेमक्या तरतुदी...

  • डेटाच्या गैरवापराला आळा घालणे.

  • व्यक्तिगत डेटाचा संग्रह आणि वापर वैध मार्गाने आणि सुरक्षितपणे व्हावा.

  • जाहीर उद्दिष्टांपुरताच डेटाचा वापर केला जावा.

  • गैरवापर झाल्यास वापरकर्त्या संस्थांवर जबाबदारी निश्चिती करणे.

  • नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करणे.

  • डेटा प्रोटेक्शन बोर्ड स्थापन करणे.

  • उल्लंघनाची माहिती सुरक्षा बोर्डाला पारदर्शक पद्धतीने द्यावी. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रामदास कदम यांच्या वक्तव्याचा रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर निषेध; रायगडमध्ये आंदोलनाचा इशारा

Custard Apple : लांबसडक अन् घनदाट केसांसाठी सीताफळ फायदेशीर, 'असा' करा वापर

Health Tips : किती वर्षे दारू पिल्यानंतर लिवर खराब होतं? डॉक्टरांचा खुलासा वाचून आजच प्यायची बंद कराल

Pressure Cooker Cleaning: प्रेशर कुकरच्या शिटीमध्ये घाण साचलीये? या सोप्या पद्धतीने 2 मिनिटांत करा साफ!

Weather Update: 60KMPH वेगाचा सोसाट्याचा वारा अन् मुसळधार धारा; 5 दिवस 7 राज्यात धुव्वाधार पाऊस

SCROLL FOR NEXT