DHARMENDRA PRADHAN WILL NOT RESIGN saam tv
देश विदेश

धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत? नीट पेपरफुटी प्रकरणी मोदी सरकारची ठाम भूमिका

Dharmendra Pradhan No Resignation Neet Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणावरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळत मोदी सरकार ठाम. परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक करण्यावर भर.

Omkar Sonawane

नीट पेपरफुटी प्रकरणावरून कॉक्रोच जनता पार्टी आणि विरोधकांकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना मोदी सरकारने स्पष्ट संकेत दिले आहेत की ही मागणी मान्य केली जाणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत आणि सरकारला हा प्रश्न सोडवण्यासाठी तो उपाय योग्य वाटत नसल्याचे सांगितले जात आहे. सरकारचे म्हणणे आहे की, राजीनामा देऊन जबाबदारीपासून दूर पळणे हा सर्वात सोपा मार्ग आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. जनतेने सरकारला जनादेश दिला आहे आणि सरकार आपली जबाबदारी पार पडत असून शिक्षण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करेल. संपूर्ण पक्ष हा धर्मेंद्र प्रधान यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.

सूत्रांनी सांगितले की, नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये असलेल्या त्रुटी आणि अडचणी जाणून घेत आहोत. सरकार या सगळ्याची एक सविस्तर यादी तयार करत असून त्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. पेपर फुटीच्या अनेक टोळ्यांचा आधीच पर्दाफाश करण्यात आला आहे. तपास यंत्रणा मोठ्या प्रमाणात कारवाई करत असून येत्या काही दिवसांत अशा नेटवर्कविरोधात आणखी कडक पावले उचलली जातील. राजीनाम्याच्या राजकारणाऐवजी देशातील परिक्षा पद्धती पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवण्यावर सरकारचा मुख्य भर आहे.

यापूर्वी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रतिनिधीनी स्पष्ट केले की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या बाबतीत कुठलीही तडजोड करणार नाही. तसेच दिल्ली पोलिसांनी आणि रॅपिड अॅक्शन फोर्सने सार्वजनिक माफी मागावी अशीही मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Military Sleep Method: रात्री लवकर झोप येत नाही? मग 'मिलिटरी स्लीप मेथड' वापरुन येईल २ मिनिटांत गाढ झोप

Ashadhi Ekadashi 2026 Wishes : अवघे गरजे पंढरपूर! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा; WhatsApp, Facebook वर शेअर करा हे भक्तिमय संदेश

Maharashtra News Live Update: पुण्यात शनिवारवाड्यासमोर CJP चं आंदोलन

दररोज एक वाटी मोड आलेले मूग खा, शरीराला होतील जबरदस्त फायदे

Aashadhi Ekadashi 2026 : उपवासाला सतत तेच खाऊन कंटाळलात? १० मिनिटांत बनवा स्वादिष्ट गूळ-शेंगदाणा लाडू

SCROLL FOR NEXT