Dhanbad Fire News 6 people including a doctor couple died in heavy fire in Clinic  SAAM TV
देश विदेश

Dhanbad Fire News: धनबादच्या हाजरा क्लिनिकमध्ये भीषण आग, डॉक्टर दाम्पत्यासह ६ जणांचा मृत्यू

Dhanbad Clinic Fire News: मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रात्री उशिरा दोनच्या सुमारास घडली. आधी रुग्णालयाच्या स्टोअर रूममध्ये आग लागली आणि त्यानंतर ती पसरत गेली.

Chandrakant Jagtap

Dhanbad Clinic Fire News: धनबादमध्ये हाजरा क्लिनिक आणि हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत डॉक्टर दाम्पत्यासह एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर डॉक्टर कुटुंबासह राहत होते. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.

हेमंत सोरेन यांनी ट्वीट करून म्हटले की, "धनबाद स्थित हाजरा मेमोरियल रुग्णालायत रात्री उशीरा लागलेल्या आगीत प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्य डॉ. विकास आणि डॉ. प्रेमा हाजरासह एकूण ६ लोकांच्या मृत्यूने मन आहे. परमात्मा दिवंदगत आत्म्यांना शांती प्रदान करून शोकाकुल परिजनांना दु:खाच्या या बिकट प्रसंग सहन करण्याची शक्ति देओ."

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रात्री उशिरा दोनच्या सुमारास घडली. रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर डॉक्टरांचे खासगी निवासस्थान असून त्याच्या शेजारीच दुकान, स्वयंपाकघर आणि पूजागृह असल्याचे कळतेय. रात्री उशिरा आधी रुग्णालयाच्या स्टोअर रूममध्ये आग लागली आणि त्यानंतर ती हळूहळू इतर ठिकाणी पसरत गेली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. शहरातील बँक मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेलिफोन एक्सचेंज रोडवर हे हॉस्पिटल आहे.

ही आग लागली तेव्हा रुग्णालयातील सर्वजण झोपेत होते. ही आग एवढी भीषण होते की काही वेळाताच संपूर्ण निवासी कॉम्प्लेक्स धुराने भरून गेले होते. या घटनेत डॉक्टर दाम्पत्यासह, एक घरगुती नोकर, डॉक्टरांचा पुतण्या आणि एका नातेवाईकासह पाच जणांचा मृत्यू झाला. हे सर्व मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमधून सापडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

Electric Scooter: तीन लोकांसाठी योग्य आहे का इलेक्ट्रिक स्कूटर? जाणून घ्या स्कूटरची वजन क्षमता आणि परफॉर्मन्स

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

Maharashtra Live News Update: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

SCROLL FOR NEXT