Jyotiraditya Scindia  Saam Tv
देश विदेश

DGCA: आता विमानतळावर होणार वॉर रुम, प्रवाशांच्या सुविधेसाठी जारी केल्या नव्या एसओपी

Jyotiraditya Scindia : विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी विमान कंपन्यांना भविष्यातील परिस्थिती कमी करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (SOP) जारी केली. सिंधिया म्हणाले, हवामानामुळे उड्डाण रद्द करणे आणि विलंब झाल्यामुळे होणारी गैरसोय कमी करण्यासाठी DGCA प्रवाशांच्या चांगल्या प्रक्रिया आणि सोयीसाठी एअरलाइन्ससाठी एक SOP जारी करणार आहे.

Bharat Jadhav

Jyotiraditya Scindia Issued Sop To All Airlines:

दिल्लीमध्ये थंडी वाढली असून तेथे सर्व धुकं पसरलं आहे. या धुक्यांमुळे एअरलाइन्स कंपन्यांना आपली विमानांचे उड्डाण वळावावी लागत आहेत. तर काही विमानांचे उड्डाण रद्द करावी लागत आहेत. धुक्क्यांमुळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पुढील भविष्यातील स्थिती कमी करण्यासाठी एअरलाइन्स कंपन्यांना मानक कार्यप्रणाली जारी केल्या आहेत. धुक्क्यांमुळे होणारे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व यंत्रणा २४ तास काम करत असल्याचं सिंधियां म्हणाले. (Latest News)

ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी सोशल मीडिया (social media) अकाउंट 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत याची माहिती दिली. धुक्यामुळे होणारे व्यत्यय आणि प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी काल सर्व विमान कंपन्यांना मानक कार्यप्रणाली (SOPs) जारी करण्यात आल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. सर्व ६ मेट्रो विमानतळांसाठी दिवसातून तीनवेळा घटनेचा अहवाल मागवण्यात आला. SOP आणि CAR चे निरीक्षण केले जाईल आणि नियमितपणे अहवाल दिला जाईल. तसेच विमानतळांवर 'वॉर रूम' उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

  • सर्व ६ मेट्रो विमानतळांसाठी दिवसातून तीनवेळा घटनेची माहिती मागवली जाईल.

  • SOP आणि CAR चे निरीक्षण केले जाईल आणि नियमितपणे अहवाल दिला जाईल.

  • ६ मेट्रो विमानतळावरील एअरलाईन ऑपरेटरना प्रवाशांच्या गैरसोयीच्या कोणत्याही समस्यांचे त्वरित निराकरण करण्यास सांगितले जाईल.

  • CISF ची उपलब्धता २४ तास सुनिश्चित केली जाईल.

  • RWY 10/28 हे री-कार्पेटिंगनंतर दिल्ली विमानतळावर CAT III म्हणून देखील ऑपरेट केले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT