tirumala tirupati Saam Tv News
देश विदेश

Tirumala Tirupati temple: तिरूमला मंदिरात अंडा बिर्याणी खाताना भाविक स्पॉट, परिसरात गोंधळ

Tamil Nadu devotees at Tirumala: तिरूमला येथे रामबागीचा बसस्थानकाजवळ अंडा बिर्याणी खाताना भाविक पकडले गेले आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला असून, विरोधकांनी तिरूमला तिरूपती देवस्थानामवर टीकेची झोड उठवली आहे.

Bhagyashree Kamble

तिरूमलामधील प्रसादाचा लाडू काही महिन्यांपूर्वी चर्चेचा विषय ठरला होता. लाडवामध्ये जनावराची चरबी आढळल्यानं खळबळ उडाली होती. अशातच तिरूमला तिरूपती मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तिरूमला येथे रामबागीचा बसस्थानकाजवळ अंडा बिर्याणी खाताना भाविक पकडले गेले आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला असून, विरोधकांनी तिरूमला तिरूपती देवस्थानमवर टीकेची झोड उठवली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तामिळनाडूतील काही भाविक तिरूमला तिरूपती मंदिरातील रामबागीचा बसस्थानकाजवळ अंडा बिर्याणी खात होते. ही बाब उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची माहिती तिरूमला पोलिसांना देण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि भाविकांना हे कायद्याच्या विरोधात असल्याचं सांगितलं. तिरूमला तिरूपती मंदिरात मद्यपान, मांसाहार, सिगारेट ओढणे आणि तंबाखू चघळण्यास सक्त मनाई आहे. हा नियम गेल्या अनेक दशकांपासून लागू करण्यात आला आहे. पण तामिळनाडूतील काही भाविकांनी हा नियम मोडला.

जेव्हा पोलिसांनी भाविकांना तिरूमलामध्ये अंडी आणि इतर मांसाहार निषिद्ध असल्याचं सांगितलं, तेव्हा भाविकांनी यासंदर्भात काहीच माहिती नसल्याचं सांगितलं. त्यानंतर तिरूमला पोलिसांनी कडक ताकीद देऊन त्यांना सोडलं. मात्र, यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी टीकेची झोड उठवली. टीटीडीचे माजी अध्यक्ष भूमना करूणाकर रेड्डी यांनी टीटीडी प्रशासनावर टीका केली. सुरक्षा भंगामुळे या गोष्टी होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भूमना करूणाकर रेड्डी म्हणाले, ही घटना टीटीडी सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी स्पष्टपणे अधोरेखित करते. कारण तामिळनाडूमधील भाविक अलिपिरी चेकपाॅईंटवरील सुरक्षा तपासणी पार पडल्यानंतरही अंडा बिर्याणीची पाकीटे घेऊन जाऊच कसे शकतात? असा प्रश्न उपस्थित होतो.' तसेच तिरूपतीचे खासदार डॉ. एम गुरूमुर्ती यांनीही या घटनेवर चिंता व्यक्त केलीय. या घटनेनंतर तिरूमला तिरूपती मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: अमावस्येच्या मध्यरात्री नग्न होऊन खोदायचा कबरी; महिलांचे मृतदेह बाहेर काढून भयंकर कृत्य; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

SCROLL FOR NEXT