Donald trump  Saam tv
देश विदेश

अमेरिकेचा हेकेखोरपणा, जगात युद्ध भडकणार? डोनाल्ड ट्रम्प यांची रणनीती काय? VIDEO

Donald trump latest news : अमेरिकेच्या हेकेखोरपणामुळे जगात भीषण युद्ध भडकण्याची शक्यता आहे... कारण ट्रम्प यांनी जगाला युद्धाच्या खाईत लोटण्याची रणनीतीच आखलीय.. ती नेमकी कशी.. आणि डेन्मार्कनं ट्रम्पच्या धमकीला कसं धुडकावून लावलंय..पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.....

Vishal Gangurde

डेन्मार्कचा भाग असलेल्या आणि जगातील सुंदर प्रदेश असलेल्या ग्रीनलँडमध्ये विध्वंस होण्याची शक्यता आहे.. आणि त्यामागचं कारण आहे युद्धखोर डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी डेन्मार्कला उघडपणे दिलेली धमकी .. त्याच पार्श्वभुमीवर डेन्मार्कच्या पंतप्रधान फेडरिक निल्सन यांनी अमेरिकेला थेट गोळीनं उत्तर देण्याचा इशारा दिलाय... तर दुसरीकडे युरोपियन महासंघानंही सदस्यदेश असलेल्या डेन्मार्कच्या संरक्षणासाठी युद्धनौका आणि लढाऊ विमानं तैनात केलेत..युरोपियन महासंघानं ग्रीनलँडच्या संरक्षणासाठी कशा पद्धतीने रणनीती आखलीय..पाहूयात.

फ्रान्स, जर्मनीच्या युद्धनौका आणि लढाऊ विमानं डेन्मार्कमध्ये दाखल

ब्रिटननेही सैन्य पाठवण्याची केली घोषणा

डेन्मार्कची राजधानी नूकमध्ये 100 जवानांची तुकडी दाखल

कंगेरलुसुआक मध्येही डेन्मार्कनं सैन्य केलं तैनात

आधीच युरोप रशिया आणि युक्रेन युद्धामुळे होरपळून निघालाय.. त्यात आता विस्तारवादी डोनाल्ड ट्रम्प यांची वक्रदृष्टी ग्रीनलँडवर पडलीय.. त्यामुळे रशियाचा बागुलबुवा दाखवून ग्रीनलँड ताब्यात घेण्याचा आणि नैसर्गिक साधनसंपत्ती ओरबाडण्याचा कावा ट्रम्पने आखलाय.. मात्र आधी युरोपियन महासंघ आणि आता डेन्मार्कनेही आरपारचा नारा दिलाय.. त्यामुळे लालबुंद झालेल्या डोनाल्ड ट्रम्पने युरोपियन महासंघावर 10 टक्के टॅरिफ लादलाय.. तर जूनपासून तो 25 टक्क्यांपर्यंत नेण्याचा इशारा दिलाय.. मात्र हे देश ट्रम्प यांच्या धमकीला भीक घालत नसल्यानं ट्रम्प आणखीच चवताळलेत.. त्यांनी लढाऊ विमानं ग्रीनलँडच्या दिशेनं पाठवलेत... मात्र डोनाल्ड ट्रम्प ग्रीनलँड जिंकण्यासाठी एवढे उतावीळ का झालेत.. त्याचं कारण ग्रीनलँडमधील नैसर्गिक संसाधनांमध्ये आहे.

ग्रीनलँडमध्ये निओमियम, लॅन्थेनम आणि डिस्प्रोसिअम सारख्या मौल्यवान खनिजांचे साठे

हवामान बदलामुळे बर्फ वितळत असल्यानं आर्क्टिक मार्गावर ताबा हवा आहे

रशियाच्या नोवाया जेमेलिया अणू तळावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी

खरंतर 57 हजार लोकसंख्या असलेल्या ग्रीनलँड आणि 6 लाख लोकसंख्या असलेल्या डेन्मार्कने अमेरिकेला लाल डोळे दाखवलेत... त्यामुळे ग्रीनलँडचा घास घेणं अमेरिकेला सहज शक्य असलं तरी नाटो आणि युरोपियन महासंघाच्या दबावामुळे ट्रम्प यांचे धाबे दणाणलेत... त्यानंतरही ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर हल्ला केल्यास जगात भीषण युद्ध भडकण्याची शक्यता आहे.. ज्यात संपूर्ण जग होरपळून गेल्याशिवाय राहणार नाही...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'भाजपचा वॉच, नगरसेवकांचे फोन टॅप'; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Maval Politics: फॉर्म भरण्याच्या दिवशीच मावळात हाय व्होल्टेज ड्रामा; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भाजप शिंदेसेनेविरोधात पोलिसात जाणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Fact check: कर्ज देणारा करोडपती भिकारी...; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra Politics: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का? अजित पवारांच्या गटातील बड्या नेत्याचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT